बीड : पालकांची परवानगी आणि ग्रामपंचायतची ना हरकत मिळाल्यानंतर जिल्ह्यातील शाळा १५ जुलैपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या दिवशी ८५ शाळा सुरू झाल्या, तर सोमवारपासून आणखी २२ शाळा सुरू झाल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण केलेले शिक्षक वर्गावर जात असून, कोरोना चाचणीही करून घेत आहेत.
मागील शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे विस्कळीत झाले होते. शाळांमार्फत ऑनलाइन अभ्यास दिला जात होता. मात्र, ही प्रणाली फारशी प्रभावी ठरली नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नववी ते बारावीचे वर्ग भरले, परंतु काही शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सुरू असलेल्या शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शासनाच्या निर्णयानुसार, ८वी ते १२वीचे वर्ग काही ठिकाणी सुरू झाले.
आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक - ६,६००
दोन्ही डोस झालेले शिक्षक - ६,२००
पहिल्या दिवशी टेस्टिंग करून शाळेत आलेले शिक्षक - ८००
पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी २,६५२ विद्यार्थी व जवळपास ९०० शिक्षक उपस्थित होते.
एकूण मुले मुली
एकूण
आठवी- ५१,८०२ नववी- ४९,८९३ दहावी- ४८,९८३ अकरावी- ४२,४४० बारावी- ३६,७३२ जिल्ह्यात पहिल्या दिवशी ८५ शाळा उघडल्या.
वडवणी तालुक्यात २, पाटोदा ०, अंबेजोगाई ८, गेवराई ९, आष्टी ०, माजलगाव ७, धारूर ९, केज १२, परळी १३, शिरूर २१, बीड तालुक्यात ४ शाळा उघडल्या.
शिक्षकांची अडचण वेगळीच
पालकांशी संवाद साधून शिक्षक शाळा सुरू करण्याच्या मानसिकतेत आहे, परंतु जेथे शाळा सुरू करायची, त्या गावात महिनाभरात एकही रुग्ण आढळलेला नसावा, अशी अट आहे. परवाच दोन रुग्ण निघाले, मागील आठवड्यात रुग्ण आढळल्याचे कारण देत, ग्रामपंचायत ना हरकत देण्यास हात आखडता घेत आहेत.
लसीकरण, कोरोना चाचणी करूनच शिक्षक शाळेत
शासन निर्देशानुसार, जिल्ह्यात ८वी ते १०वीचे वर्ग भरण्यास ८० शाळांमध्ये सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्यात शाळांची संख्या आणि विद्यार्थी उपस्थितीही वाढेल. शाळा सुरू करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क करत आहोत. सुरू झालेल्या शाळेत शिक्षक कोरोना लसीकरण व चाचणी करूनच जात आहेत.
- डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.)