शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तथागत चौक ते पोखरी रस्त्याची मोठी दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

अंबाजोगाई : शहरालगत असणारा अंबाजोगाई- पोखरी- सायगाव हा मुख्य रस्ता अंबाजोगाई येथून लातूरला जाण्यासाठी अतिशय जवळचा व कमी अंतराचा ...

अंबाजोगाई : शहरालगत असणारा अंबाजोगाई- पोखरी- सायगाव हा मुख्य रस्ता अंबाजोगाई येथून लातूरला जाण्यासाठी अतिशय जवळचा व कमी अंतराचा रस्ता असून, अंबाजोगाई येथील तथागत चौक ते पोखरी जाणाऱ्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी दिला आहे.

या मुख्य रस्त्यालगत जोगाईवाडी परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी २ ते ३ किलोमीटर अंतरावर खूप मोठ्या प्रमाणात लोकांची राहती घरे निर्माण झालेली असून, वस्ती वाढतच आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जवळपास ४ ते ५ शाळा असून, सदर शाळेला ये-जा करणारी लहान मुले, पालक, महिला शिक्षिका व कर्मचारी व तसेच लोकवस्तीतील शेकडो लहान मुले व पालक याच रस्त्याने ये-जा करतात, तसेच स्कूलबससुद्धा याच रस्त्याने जातात. त्याचप्रमाणे पोखरी या गावातील सर्व नागरिकांना अंबाजोगाई येथे जा-ये करण्यासाठी एकमेव हाच रस्ता आहे, तसेच अनेक शेतकरी बांधवांना शेतामध्ये जा-ये करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. रोज हजारो वाहने चारचाकी, दुचाकी या रस्त्याने जा-ये करतात. एकूणच अंबाजोगाई ते पोखरी जाणाऱ्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी असंख्य व्यापारी व हजारो लोकांच्या दैनंदिन वाहतुकीचा वापर होत असून, हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये अंबाजोगाई ते पोखरी, तथागत चौक ते पोखरी या रस्त्याचे पक्के बांधकाम करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम होण्यासाठी प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी; अन्यथा जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा ॲड. माधव जाधव, ॲड. सुधाकर सोनवणे, ॲड. सतीश घोगरे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

310721\3439img-20210731-wa0073.jpg

या रस्त्याचे काम लवकर व्हावे या मागणीचे निवेदन देण्यात आले