शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

घरकुल लाभार्थ्यांनी अनुदान अल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

------------------------- राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ अंबाजोगाई : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग अंबाजोगाई शहरातून गेला आहे. जवळपास ४ किलोमीटरपर्यंतच्या महामार्गावर ...

-------------------------

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ

अंबाजोगाई : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग अंबाजोगाई शहरातून गेला आहे. जवळपास ४ किलोमीटरपर्यंतच्या महामार्गावर साखर कारखाना परिसरात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असते.

-------------------------

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

अंबाजोगाई : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कोंबडे यांनी केली आहे.

-------------------------

रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण

अंबाजोगाई: तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही

दिवसांपासून रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वनविभागाला रानडुकरांच्या उपद्रवाची माहिती दिली. मात्र, वन विभागाच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

-------------------------

स्वच्छतेच्या अभाव; आजाराला आमंत्रण

अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी मोहीम आखण्याची गरज आहे.