शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईपर्यंत ग्रामसेवकांचा कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ ...

प्रशासनाच्या नोटिसीनंतर पवित्रा : अपहार, अनियमितता झाली नसल्याचा दावा

बीड : ‘काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक’ या धोरणामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ैहैराण झाले असून, जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना नरेगाच्या सर्व कामावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बळिराम उबाळे व सचिव भगवान तिडके यांनी दिली.

सध्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना नरेगा विषयात नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यामध्ये मागील १० वर्षांत झालेल्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेप नोंदविलेले आहेत. परंतु, हे लेखा आक्षेप ग्रामपंचायतीला ७ ते १० वर्षांपासून प्राप्त झालेले नाहीत. या आक्षेपांबाबत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवकांना कसल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आक्षेपांची पूर्तता करण्याची संधी मिळालेली नाही. काही बँका व लेखापरीक्षकांच्या तांत्रिक चुकांमुळे रोखीने देयक दिल्याचे आक्षेप नोंदविले आहेत. वास्तविक ग्रामपंचायतीने संबंधित एजन्सी किंवा लाभार्थींना धनादेशाद्वारे रकमा दिलेल्या आहेत. तसेच वैयक्तिक ज.ल.वि. व इतर वैयक्तिक कामे पूर्ण होऊन त्यांची देयके (कुशल) दोन ते तीन वर्षांनी ग्रामपंचायतीला प्राप्त होतात. त्यामुळे या कालावधीत कोणतीही एजन्सी किंवा दुकानदार उधारीवर थांबत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पदरमोड करून त्यांचे पैसे दिलेले असतात. साधारणत: दोन वर्षांनंतर कुशल देयके प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायतीने संबंधित शेतकऱ्यांना चेकद्वारे कुशल देयके अदा केलेली आहेत. त्यामुळे या कामात कसल्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता झालेली नसल्याचे उबाळे यांनी सांगितले. तसेच नरेगा यंत्रणा ही केंद्र शासनाची योजना असून, राज्य शासन किंवा वेगळी यंत्रणा नाही. त्यामुळे योजना राबविण्यासाठी व कंत्राटी पद्धतीची यंत्रणा निर्माण केली, ज्यामध्ये तालुका स्तरावर ग.वि.अ., शाखा अभियंता, लेखा अधिकारी, वि.अ., एपीओ, डीपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्यामार्फत फाईल जाते. ग्रामपंचायतीकडूनही मंजूर कामाची हजेरी पत्रके व कुशल देयके या यंत्रणेकडून तपासून दिली जातात. त्यामुळे नरेगात चुका होण्याची शक्यता नसते. लेखापरीक्षकांनी काढलेल्या आक्षेपानुसार नोटीस फक्त ग्रामसेवक, सरपंचांनाच देण्यात आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे काम केले प्रशासनाने आणि बळीचे बकरे म्हणजे ग्रामसेवक, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक हैराण झाले आहेत. त्यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला व जाचाला वैतागून ग्रामसेवक न्यायासाठी राज्य शासन व न्यायालयाकडे दाद मागत आहेत. जोपर्यंत नरेगासाठी ग्रामसेवक वगळता स्वतंत्र यंत्रणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना या नरेगाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकत आहे, असे बळिराम उबाळे व भगवान तिडके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.