शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चास ग्रामपंचायतींचा ठेंगा, पालिकेने तोडले 11 गावचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:49 IST

माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमाजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते.देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात.

माजलगाव ( बीड ), दि. 14 : माजलगांव धरणामधून शहर व आजूबाजूची 11 खेडे अशी संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली जाते. याच्या देखभालीची जबाबदारी माजलगांव नगर पालिकेवर आहे. योजनेच्या देखभालीचा खर्च मोठया प्रमाणावर असल्याने या 11 खेडयांनी मिळुन खर्च उचलायचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या ग्रामपंचायती देखभाल खर्च जमाकरण्यात ठेंगा दाखवत आहेत. यामुळे नगरपालिकेने या गावांची पाणी कपात केल्याने या गावातील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहर व 11 गावे अशी १२ गावांची तहान भागवणारी पाणी पुरवठा योजना म्हणून या योजनेची ओळख आहे. यात शेलापुरी, रेणापुरी, चिंचगव्हाण, देवखेडा, नांदुर,भाटवडगांव, मनुर आदी गावांना माजलगांव धरणात असलेल्या जॅकवेलद्वारे फिल्टर प्लॅंटमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. योजना राबवताना नगर पालिका व संबंधीत 11 खेडे यांच्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या रकमेसंबंधात स्पष्ट करार झालेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने देखभालीची जबबादारी घेत त्यांचा हिस्सा उचलायचा असुन 11 खेडयांनी देखील त्यात आपली हिस्सेदारी जमा करावयाची आहे. 

करारानुसार मागील अनेक दिवसांपासुन नगर पालिका या 11 खेडयांमधील कारभा-यांना पैसे जमा करण्या बाबत वारंवार कळविते. परंतु,  सदरील 11 खेडयांमधील कारभारी मात्र पालिकेने दिलेल्या नोटीसांना दाद देण्यास तयार नसतात. पालिकेने चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु, कधी 10 हजार तर कधी 5 हजार अशी जुजबी रक्कम भरु ते आश्वासन देत. देखभाल खर्च मोठा असल्याने शेवटी पालिकेने मागील आठ दिवसांपासुन संबंधीत गावांचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. येणा-या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने या गावात एकच खळबळ उडाली आहे. 

18 लाखाचे येते बिल  नगर पालिकेला या योजनेच्या विद्युत बिलापोटी दरमहा सुमारे 18 लक्ष रुपये भरावे लागतात. या खर्चाचा मोठा ताण पालिकेवर पडत आहे त्यामुळे नाईलाजास्तव पालिकेस हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाणी पुरवठा अधिका-यांनी सांगितले.  यासोबतच ११ गावचे प्रतिनिधी आपला वाटा भरत नाहीतच उलट पुरवठा सुरु करा नाहीतर आंदोलन करू अशा धमक्या देतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  

रक्कम भरताच पाणी पुरवठा पुर्ववत करू 

ही योजना 13 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून या योजनेतून शहरा बरोबरच 11 खेडयांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु,  संबंधीत ग्रामपंचायतींना वारंवार सुचना तसेच नोटीस देवून देखील ते देखभाल व दुरुस्तीसाठी साठीचे रक्कम पालिकेकडे जमा करीत नाहीत. रक्कम जमा करताच पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. -सहाल चाउस, नगराध्यक्ष