शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयात नियंत्रणा अभावी सरकारी डॉक्टरांची ‘दुकानदारी’ जोरात; वर्ग एकची १६ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:14 IST

जिल्हा रुग्णालयातील वर्ग एकच्या तज्ज्ञांची १९ पैकी तब्बल १६ पदे रिक्त आहेत. प्रभारीच कारभारी बनल्याने मनमानी सुरु आहे. त्यामुळेच रुग्णांची पळवापळवी करुन सरकारी डॉक्टरांची दुकानदारी जोरात सुरु आहे. केवळ नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सूत्रांकडून समजते.

बीड : जिल्हा रुग्णालयातील वर्ग एकच्या तज्ज्ञांची १९ पैकी तब्बल १६ पदे रिक्त आहेत. प्रभारीच कारभारी बनल्याने मनमानी सुरु आहे. त्यामुळेच रुग्णांची पळवापळवी करुन सरकारी डॉक्टरांची दुकानदारी जोरात सुरु आहे. केवळ नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सूत्रांकडून समजते.

जिल्हा रुग्णालयातील रुग्ण दलालास ५०० रुपये कमिशन देऊन आपल्या खाजगी रुग्णालयात पळविण्याचा सपाटा सरकारी डॉक्टरांनी लावला आहे. याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. अनेकांचे धाबे दणाणले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याची गंभीर दखल घेऊन गुरुवारी सर्व डॉक्टरांना बोलावून खडेबोल सुनावल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात केवळ हेच नियमित आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे पद रिक्त असून, नेत्र तज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांच्याकडे याचा अतिरिक्त पदभार आहे. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे पदही रिक्त असून, अतिरिक्त पदभार डॉ. सतीश हरीदास यांच्याकडे आहे. दोघांवरच जास्त जबाबदारी आल्याने सर्वत्र नियंत्रण ठेवणे जिकिरीचे बनते. कार्यालयीन कामकाजाबरोबरच जिल्हा रुग्णालय व बाह्य केंद्रांची तपासणी करताना त्यांना वेळ अपुरा पडतो. याचाच गैरफायदा घेऊन सरकारी डॉक्टर आपली दुकानदारी चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात हे बैठक, भेटी व इतर कारणांमुळे नेहमीच व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना याकडे पाहण्यास वेळ मिळत नाही. यावर नियंत्रण मिळवून सर्वसामान्यांचे हाल थांबवावेत, त्यांना जिल्हा रुग्णालयातच दर्जेदार व वेळेवर उपचार द्यावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दलालांना थारा देऊ नयेएखादे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी दलालांचा हस्तक्षेप असतो.डॉक्टरांनी थेट रुग्णांनाच प्रवेश देऊन दलालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून  होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी या प्रकरणात लक्ष घालून दलालांचा बंदोबस्त करावा, अशी  मागणी जोर धरु लागली आहे.

तीन वर्षांपासून ही पदे रिक्तमागील तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील १६ पदे रिक्त आहेत. यामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, फिजिशियन तज्ज्ञ, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ - २, नेत्र तज्ज्ञ, हाडांचे तज्ज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य), जिल्हा प्रशिक्षण केंद्र, शवविच्छेदन विभाग यांचा समावेश आहे.