अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराच्या गुरुवारपेठ या भरवस्तीत असणारे सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम,सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी रविवारी रात्री झाली.
अंबाजोगाई शहरातील गजबजलेल्या गुरूवार पेठेत परमेश्वर संदिपान गंगणे यांचे हार्षदा सुवर्णकार या नावाने सोने चांदीचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे गंगणे रविवारी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करुण घरी ते घरी गेले. रात्री २.३० च्या सुमारास चोर पांढऱ्या रंगाच्या इंडीगो गाडीने आले. तोंडाला कपडा व मास्क बांधलेले तिघे गाडीतून उतरुण दुकानाच्या वर असलेल्या कॅमेऱ्याची दिशा बदलली . तर एक जन गाडीमध्ये थांबून बाहेरच्या हालचालीची माहिती देत होता. त्या दोघांनी टांबीच्या साह्याने कुलूप तोडून अर्धवट शटर उघडत आत प्रवेश केला. प्रथम कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडून डिव्हीआर ताब्यात घेतला व नंतर चोरी केली. गल्यातील नगदी ५४ हजार रुपये,६३ हजार रुपयाचे सोने तर दिड लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू असा असा एकूण २,६७,३०० रुपयाचा नगदी ऐवज चोरला. व दुकानातील तिजोरी चोरुन घेऊन जाण्याचे उद्देशाने तिजोरी बाहेर काढली होती. रस्त्यावर थांबलेल्या गाडीत चोर तिजोरी टाकण्याच्या तयारीत होते. शटरचा आवाज व हालचाली दुकान मालकाच्या कुटूंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी कोण आहात, या वेळी काय करायलात? असा आवाज देताच तिजोरी रस्त्यावर सोडत सोने चांदीचा एैवज व नगदी ५४००० हजार असा एकूण २, ६७, ३०० रुपयावर डल्ला मारत चोर गाडीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार बाजुला असलेल्या दुकानातील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अज्ञात चार चोराविरुद्ध परमेश्वर संदिपान गंगणे यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाआहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत. झालेली चोरी सीसीटीव्ही कॅंमेऱ्यात कैद झाल्याने चोरीच्या तपासात मोठे सहकार्य होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.