शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत व्यापारी पेठ, बँकेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

गेवराई : कोरोना स्थितीमध्ये बीड जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले, मात्र याचा गैरफायदा ...

गेवराई : कोरोना स्थितीमध्ये बीड जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले, मात्र याचा गैरफायदा घेत शहरात व ग्रामीण भागातील बँकेत, दुकानात, व्यापारी पेठेत लोक दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने बिनधास्तपणे रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवली जात आहेत. त्यामुळे कोरोना नियमांची पायमल्ली होत असून कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यातील अनेक निर्बंध शिथिल केले होते. त्यामुळे तालुक्यातील सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा दिली. कोणत्याही ठिकाणी जास्त गर्दी करू नये, तोंडाला मास्क लावणे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आदेश प्रशासनाने वेळोवेळी दिलेले आहेत. असे असतानाही शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी गर्दी होत असल्याने यात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. नगर परिषद, पोलीस, महसूल विभागाचे कोणतेच अधिकारी फिरकत नसल्याने गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

===Photopath===

250621\20210625_134729_14.jpg