शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी जेरबंद, आंध्र प्रदेशातून आले बीडला; पकडले परभणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:39 IST

रस्त्यात थांबलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी मंगळवारी मध्यरात्री गजाआड करण्यात आली.

पाथरी (जि. परभणी)/गंगामसला (जि. बीड) : रस्त्यात थांबलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी मंगळवारी मध्यरात्री गजाआड करण्यात आली. पकडलेले शेख जावेद शेख सुलेमान, शे.नसीर शे.सुलेमान, करुणाकरन व्यंकटेश रलू तंनेरू हे तीनही लुटारू आंध्र प्रदेशातील आहेत. ही कारवाई माजलगाव व पाथरी पोलिसांनी पाथरी (जि. परभणी) येथील बायपास रोडवर केली. पकडलेल्या लुटारूंची बुधवारी रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती.गंगामसला येथील निवृत्ती तुकाराम सोळंके हे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता खरात आडगाव येथुन आपल्या दुचाकी(एम एच४४-२९७९)वर गावाकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील छोटीवाडी येथील एका पेट्रोल पंपाच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने तात्काळ मिरची पुड काढून सोळंके यांच्या डोळ्यात टाकली. यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पाथरीच्या दिशेने पसार झाले. सुदैवाने सोळंके यांनी त्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहिला होता. त्यानंतर ही माहिती तात्काळ गंगामसला येथील काही तरूणांना समजली. काही तरूणांनी लगेच दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग केला. तोपर्यंत ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांना समजली. त्यांनी पोउपनि विकास दांडे यांना आदेश देऊन गंगामसला दिशेने रवाना केले. त्यानंतर स्वत: नवटकेही चोरट्यांच्या पाठलागावर होत्या.दोन चोरट्यांना ग्रामस्थांचा चोपगंगामसला पाटीवर काही जणांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांच्याही डोळ्यात मिरची पूड टाकून हे चोरटे पाथरीकडे निघाले़ पाथरी-तुरा या रस्त्याने निघालेली चोरट्यांची दुचाकी एका खदानीजवळ घसरली आणि चोरटे खाली पडले़ यावेळी खदानीजवळ काम करणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला़ हे लोक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून एका चोरट्याने खदानीत उडी मारली तर दोघे चोरटे वेगवेगळ्या दिशेने पळून गेले़ पहाटे तीनच्या सुमारास पाथरी आणि माजलगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी खदानीत पडलेल्या शेख वजीर शेख सुलेमान यास खदानीतून बाहेर काढून पाथरी पोलीस ठाण्यात आणले़ पळून गेलेल्या दोघा चोरट्यांपैकी शेख जावेद शेख सुलेमान हा तुरा या गावात शिरला़ अंगावरील फाटके कपडे, भिजलेले शरीर पाहून ग्रामस्थांचा संशय बळावला़ काहींनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यास पकडून बेदम मारहाण केली़ नंतर त्यास ग्रामस्थांनी पाथरी पोलिसांच्या हवाली केले़ दुसरा चोरटा करुणाकरन व्यंकटेश रलू तंनेरू हा पाथरी शहराजवळील आष्टीफाट्यावर सकाळी ९ वाजता पोहचला़ या ठिकाणीही ग्रामस्थांचा तोच समज झाला आणि या चोरट्यास पकडून शेत आखाड्यावर नेऊन मारहाण केली़ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले़ सकाळी १० वाजेच्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्यात नागरिकांचा मोठा जमाव जमला होता़ या नागरिकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागली़ या तिन्ही आरोपींना घेऊन पोलीस माजलगावकडे गेले़ त्यानंतर जमाव शांत झाला़ चोरट्यांकडून एक दुचाकी (एम एच २६-३५८१) जप्त करण्यात आली आहे.पाथरी शहरात पोलिसांची जनजागृतीचोरट्यांना पकडल्याच्या घटनेनंतर ही वार्ता तालुक्यात वाºयासारखी पसरली़ मुले पळविणाºया दोघांना पकडल्याची अफवा पसरली़ त्यामुळे पाथरी पोलिसांना शहरात फिरून जाहीर आवाहन करावे लागले़ पकडलेले आरोपी मुले पळविणारे नसून अट्टल चोरटे आहेत़ अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले़गंगाखेडमध्येही दोघांना चोपगंगाखेड (जि. परभणी) : मुले पळविणारे असल्याचा संशय घेऊन गंगाखेड शहरात बसस्थानक रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांना चोप दिला. मध्यप्रदेशातील हे दोघे बुधवारी गंगाखेड शहरात आले होते. मुले पळविणाºया टोळीतील असल्याचा संशय घेऊन या दोघांना नागरिकांनी मारहाण केली. काही नागरिकांनी या दोघांची सुटका करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले.