नागपूर येथील विमानतळावर कर्तव्य बजावत असतांना गेल्या वीस दिवसांपासून सीआयएसएफमधील जवान रक्षक गजानन सोंळके यांना ब्रेन हॅम्रेज झाले. नागपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २१ मार्च रोजी गजानन सोळंके (वय ३३ वर्ष) यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नागपूर येथून हिंगणी बु. येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यांचे पार्थिव येताच अमर रहेच्या घोषणानी परिसर दणाणूण गेला होता.
सोलापूर येथून सहा जणांची टीम पोलीस निरीक्षक फ.बी. किणीकर यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यासाठी उपस्थित झाली होती. धारुर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी मुंडे, दिंद्रुड पोलिसांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण करत सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात सोळंके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
===Photopath===
220321\_mg_4114_14.jpg
===Caption===
हिंगणीचे सीआयएसएफ जवान गजानन सोळंके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.