शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

अंबाजोगाईत १३ महिन्यांत ५३७ मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

अंबाजोगाई : मागील एक वर्षापासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत शासन निर्देशानुसार ५३७ मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंबाजोगाई ...

अंबाजोगाई : मागील एक वर्षापासून ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत शासन निर्देशानुसार ५३७ मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंबाजोगाई नगर परिषदेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही जबाबदारी सांभाळतानाच कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला दररोज लागणाऱ्या आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषद पुढाकार घेत जनजागृती, प्रबोधन करत आहे. कोरोना नियंत्रणासाठी नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा, शासन निर्देशानुसार ज्या कार्यालयात बाधित कर्मचारी आढळून आले, ती शासकीय कार्यालये, शाळा यासोबतच ज्या कुटुंबांत बाधित रुग्ण आढळून आले तेथील राहते घर व निवासी जागा येथे सॅनिटायझर फवारणी केलेली आहे.

दहा लाख ५० हजार लीटर एवढा पाणीपुरवठा

अंबाजोगाई नगरपालिकेकडून टी. बी. गिरवलकर कॉलेज सी.सी. यांना ४०० गाद्या, ४३० उशा, ४०० चादरी, ४० मोठे डस्टबीन, १५० छोटे डस्टबीन, १५ नवीन पाणी जार, ६० मोठी बकेट, ४९ छोटी बकेट, ७१ मग, २४ वायपर, २२ पोछा, ४२ टॉयलेट ब्रश तसेच आवश्यकतेनुसार मास्क व सॅनिटायझर आणि स्वच्छता विषयक पूर्ण साहित्य देण्यात आले आहे. तसेच जारद्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. लोखंडी सावरगाव कोविड सेंटर, टी. बी. गिरवलकर कॉलेज सी.सी., भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेसाठी दररोज दोन घंटागाड्या कार्यान्वित आहेत. ट्रॅक्टरही स्वच्छतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. २८ मार्चपासून कमी-अधिक प्रमाणात आवश्यकतेनुसार दररोज टँकरद्वारे नियमित पाणी देण्यात येते. २८ मार्च २०२१ ते २६ एप्रिल २०२१ या कालावधीत टँकरच्या १२७ खेपांद्वारे तब्बल १० लाख ५० हजार लीटर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला असून, चार दिवसांपासून लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर रुग्णालयास पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहाची पूर्णपणे स्वच्छता, सॅनिटायझर फवारणी केली असून दररोज घंटागाडीद्वारे येथील कचरा संकलित करण्यात येतो. गरजेनुसार एल.ई.डी. बल्ब बसवून विद्युत व्यवस्था केलेली आहे.

कोविड संकटकाळात अंबाजोगाई नगर परिषदेने मदत आणि सुविधेसाठी वाटा उचलला आहे. अंबाजोगाईकरांनी मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करून, गर्दीत जाणे टाळून, आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी आणि कोरोना पार्श्‍वभूमीवर शासन निर्देशांचे व कायद्याचे पालन करावे.

- राजकिशोर मोदी, प्रभारी नगराध्यक्ष, न. प. अंबाजोगाई.