शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सोळा महिन्यांपासून पौर्णिमा वारी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

.... महिला मजूर खुरपणीत व्यस्त शिरूर कासार : पेरणी झालेल्या पिकाला गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसाने दिलासा ...

....

महिला मजूर खुरपणीत व्यस्त

शिरूर कासार : पेरणी झालेल्या पिकाला गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसाने दिलासा मिळाला आहे. आता खुरपणीची घाई सुरू असल्याने, महिला मजूर खुरपणीच्या व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

....

सायकल कोळपणीला शेतकऱ्यांची पसंती

शिरूर कासार : पाऊस पडल्यामुळे मजुरांची वाणवा जाणवत आहे. शेतकरी पिकातील तण काढण्यासाठी सायकल कोळपणी हा पर्याय निवडत आहेत. एक सायकल कोळप साधारणपणे चार ते पांच मजुरांच्या खुरपणीचे काम करीत असल्याचे शेतकरी ठकाराम कदम यांनी सांगितले.

...

शिक्षण पद्धती गुरुकुलाकडून घरकुलाकडे

शिरूर कासार : पूर्वी गुरुगृही जाऊन विद्यार्जन केले जायचे. त्याला गुरुकूल शिक्षण असे संबोधले जात असायचे. गुरुगृही राहून विद्यार्थी नव्हे, शिष्य म्हणून गुरू घरची सर्व कामे सेवाभाव या सदरातून करायची. गुरूंकडूनही अपेक्षारहित अध्यापन केले जायचे. शिक्षण संपल्यानंतर स्वखुशीने गुरुदक्षिणा देण्याची प्रथा होती. कालपरत्वे शिक्षण पद्धतीत बदल घडत गेले. शिक्षणाच्या सोयी वेगवेगळ्या माध्यमांआधारे सुरू झाल्या आहेत. शिक्षण पद्धती गुरुकुलाकडून घरकुलाकडे चालल्याचे सध्या चित्र आहे.

....

शाळा सुरू होण्याची पालकांना प्रतीक्षा

शिरुर कासार : सैनिकी शाळा, इंग्लिश स्कूल अशा शाळेत महागडे शिक्षण गळी उतरत आले. मात्र, गेल्या वर्षभराच्या काळात कोरोना महामारीने सर्वच पद्धती बंद केल्या. आता शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. शिक्षणाला पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. यात शिक्षक व विद्यार्थी यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला. परिणामी, शिक्षकांबद्दलची आत्मीयता आदरभाव हा पडद्याआड जात आहे. विद्यार्थी घरीच बसून मोबाइलवर शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी घरीच असल्याने, अनेक वेळा त्यांची हुल्लडबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. कोरोना संपून कधी एकदा शाळा सुरू होतात, याचीच प्रतीक्षा पालकांना आहे.