शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील चार पालिका, एक न.पं. झाली हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ‘आपले शहर, हागणदारीमुक्त शहर’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतींनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘आपले शहर, हागणदारीमुक्त शहर’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतींनी कठोर परिश्रम घेतले आहेत. या परिश्रमाला यश आले असून नुकताच केंद्रीय समितीचा अहवाल नगर पालिकेला प्राप्त झाला आहे. यामध्ये बीडसह गेवराई, माजलगाव, परळी या नगर पालिका व पाटोदा नगर पंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. सर्व मुख्याधिकारी आणि पालिका पदाधिकारी, कर्मचा-यांचे स्वागत होत आहे.

शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अनेक पाऊले उचलली होती. यामध्ये शौचालये बांधण्याचे आवाहन करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन अनुदान देणे, तसेच सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन करणे, शहरांमध्ये ओ.डी.एफ.स्पॉट निश्चीत करून त्याठिकाणी अधिकारी, कर्मचाºयांची नियूक्ती करणे, मोबाईलध्ये अ‍ॅप तयार करणे, उघड्यावर जाणा-यांवर पोलीस ठाण्यात कारवाई करणे, दंड ठोठावणे आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्वच्छतेचे कर्मचारी, इतर अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.बीड नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले होते. तसेच नागरिकांनी सहकार्य केले, म्हणूनच हे यश मिळू शकले, असे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या सहकार्यामुळेच यशस्वीशहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतोत. नागरिकांना आवाहन केले जात होते. त्यांनी आम्हाला सहकार्य कले. पालिका अधिकारी, कर्मचा-यांचे परिश्रम आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झालो.- हेमंत क्षीरसागरउपनगराध्यक्ष तथास्वच्छता सभापती, बीड न.प.