शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीस गेलेला चार लाख रुपयांचा मुद्देमाल केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:02 IST

शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ३२५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.

ठळक मुद्देबीड पोलीस प्रशासनाचा उपक्रम : फिर्यादी झाले भावनिक; प्रत्येक दोन महिन्याला होणार मुद्देमाल वाटप

बीड : जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडतात. यातील आरोपी पकडल्यानंतर त्याच्याकडून फिर्यादीचा चोरीस गेलेला मुद्देमाल मिळवणे हे पोलिसांसमोर आव्हान असते. ते पेलत पोलिसांकडून मुद्देमाल जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न असतो. मुद्देमाल मिळवल्यानंतर तो फिर्यादीपर्यंत पोहचवण्यासाठी मुद्देमाल वाटप कार्यक्रम घेण्यात येतो. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ४ लाख ३२५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख भारत राऊत, बीड ग्रामीण ठाण्याचे प्रमुख सुजित बडे, सपोनि पंकज जाधव यांच्यासह फिर्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ११ पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या दरोडा १, जबरी चोरी २, घरफोडी ३, चोरी १२, खंडणी १, बेवारस १ अशा ९ गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, १० गुन्ह्यातील दुचाकी असा मुद्देमाल फिर्यादीस पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे.यावेळी पोद्दार म्हणाले, चोरीस गेलेला मुद्देमाल, ऐवज याची किंमत जरी कमी असली तरी तो परत मिळणे गरजेचे असते. त्या वस्तूसोबत आपली भावनिकता दडलेली असते. त्यामुळे चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर प्रत्येकी दोन महिन्यास एकदा तो फिर्यादीला देण्याचा कार्यक्रम घेतला जावा. यावेळी बर्दापूर येथील उपस्थित फिर्यादी किरण मधुकर बिडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मला सोन्याचे दागिने सन्मानपूर्वक मिळाले. मुलीच्या लग्नासाठी हे दागिने व पैसे जमा केले होते. ते चोरीस गेल्यामुळे मी पुरता कोलमडलो होतो. परंतु पोलिसांमुळे ते मला परत मिळाले, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.यावेळी इतर फिर्यादींनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानले. मुद्देमाल परत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच इतर गुन्हे देखील लवकरच उघडकीस आणून मुद्देमाल परत केला जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस