शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सौताडा घाटात ट्रक उलटून चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:50 IST

कोळसा घेऊन येणारा ट्रक उलटून बीडच्या दिशेने दोन दुचाकीवरुन येणारे चौघे जखमी झाल्याची दुर्घटना पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटात शनिवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देकोळशाचा ट्रक दुचाकींना धडकला। जखमींवर उपचार सुरु

आष्टी : कोळसा घेऊन येणारा ट्रक उलटून बीडच्या दिशेने दोन दुचाकीवरुन येणारे चौघे जखमी झाल्याची दुर्घटना पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटात शनिवारी सायंकाळी घडली.बीडकडून एक ट्रक (एम एच ४२/ एम ९४९३) कोळसा घेऊन भिगवणकडे निघाला होता. सौताडा घाटात चालक मधुकर सुतार यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक उलटला. यावेळी ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीवरील चौघे जखमी झाले.मोहन सुखदेव पवळ, गोपीनाथ बाबासाहेब पवळ (रा.चुंबळी ता. पाटोदा) यांची दुचाकी (एम.एच.२३ पी. ६२७) ट्रकखाली दबली. अन्य एका दुचाकीवरुन (एम.एच.२३ एम ९८८०) समीर हाफिजोद्दिन काझी व त्यांची आई नसीमा बेगम हाफिजोद्दिन काझी (रा.आष्टी) येत होते.यात समीर यांचा पाय मोडला असून त्यांना नगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तर नसीमा बेगम या किरकोळ जखमी झाल्या. अपघातानंतर अनिल अडाले, महादेव वाघमारे, अनिल रेडे, अफसर शेख तसेच परिसरातील लोकांनी जखमींना मदत केली. तर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत जामखेड येथील खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल केले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात