शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्याची मुले, महाविद्यालये, बँका, उद्योजक अन् व्यापारी महावितरणचे बडे थकबाकीदार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:35 IST

महावितरणची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी काढली असता यामध्ये माजी मंत्र्याची मुले, बँका, उद्योजक, व्यापारी आदींची नावे समोर आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी काढली असता यामध्ये माजी मंत्र्याची मुले, बँका, उद्योजक, व्यापारी आदींची नावे समोर आली आहेत. या सर्वांची यादी तयार करून महावितरणने आता वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी ११६ ग्राहकांची वीज तोडली आहे. विशेष म्हणजे बड्या असलेल्या ६४६ ग्राहकांकडे तब्बल १४ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती गुरूवारीसमोर आली आहे.बीड जिल्ह्यात महावितरणचे जवळपास २ लाख ४० हजार ग्राहक आहेत. वीज वापर करूनही बिले भरण्यास ग्राहक उदासीन असल्याने थकबाकीचा आकडा अब्जावधीच्या घरात गेला आहे. हाच धागा पकडून महावितरणने आता कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. दोन टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात एक लाखांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ५० हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.घरगुती आणि व्यवसायासाठी वीज वापर करून बिले न भरणा-या ११६ ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला. कारवाईची मोहीम हाती घेताच ६२ ग्राहकांनी तात्काळ महावितरणकडे धाव घेत थकबाकी भरल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणकडून या कारवाईत किती सातत्य राहते आणि दुजाभाव न करता पारदर्शकपणे कारवाया करण्याचे आव्हान असणार आहे. सर्व थकबाकीदारांमध्ये धनदांडग्यांचा समावेश आहे. राजकीय दबाव, गुंडगिरी करून कारवाई करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांर दबाव आणला जात असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हे सर्व झुगारून कारवाई करण्याची मागणी होत आहे.मंत्र्यांची महाविद्यालये, माजी मंत्र्यांच्या मुलांकडेही लाखोंची थकबाकीमहावितरणच्या बड्या थकबाकीदारांच्या यादीमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. तसेच काही शासकीय अधिका-यांचे क्वार्टर्सचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPoliticsराजकारणelectricityवीज