शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

निजामकाळातील बनावट दस्तऐवजांचा होतोय वापर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 09:36 IST

वक्फ जमीन घोटाळा : मालकी हक्काची होणार पडताळणी, पथक रवाना

- संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वक्फ बोर्डच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची भूमाफियांनी अक्षरशः विल्हेवाट लावली, या प्रकरणी सात गुन्हे नोंद आहेत. खिदमतमास व मदतमास जमिनींचे बेकायदा हस्तांतरण करण्यासाठी निजामकालीन बनावट दस्तऐवजांचा वापर केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी हैदराबादला रवाना झाले.  

जिल्ह्यात    वक्फ बोर्डच्या मालकीची २७ हजार हेक्टर जमीन आहे. भूमाफियांनी यातील काही जमिनी गिळंकृत केल्याचे उजेडात आले. या प्रकरणी आतापर्यंत आष्टी ठाणे दोन, अंभोरा, बीड शहर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण व दिंद्रूड या ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  यात दोन तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या काही बड्या मंडळींचीही नावे एफआयआरवर आहेत. तथापि, महसूल विभागाकडून  गुन्हे नोंद झालेल्या  जमिनींशी संबंधित दस्ताऐवज मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर वक्फ बोर्ड हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी वक्फ बोर्डाकडील निजामकालीन दस्तऐवज मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बुधवारी एक पथक हैदराबादला रवाना केले आहे. 

 या पथकामार्फत बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर व  दिंद्रूड या चार ठिकाणच्या गु्न्ह्यांसंदर्भात  खरेदी-विक्री व्यवहाराचे मुंतखब (निजामकालीन दस्तऐवज) तपासण्यात येणार आहेत. हे दस्तऐवज उर्दूतील आहेत. या दस्तऐवजांआधारेच वक्फ बोर्डच्या जमिनींचे हस्तांतरण करण्यात आले. मात्र, ते दस्तऐवज बनावट आहेत की खरे, याची पडताळणी करण्यात येणार आहे.     

मुंतखब म्हणजे काय? जमीन इनाम म्हणून देताना जी सनद दिली जाते त्याला मुंतखब म्हटले हाते. त्यावर देणाऱ्याचे तसेच स्वीकारणाऱ्याचे नाव, गट क्रमांक,   तसेच गावाचे नाव आणि चतु:सीमा असते. ती सनद म्हणजेच रजिस्ट्री असल्याचे समजले जाते. निजामकाळात मुंतखब हेच रजिस्ट्री दस्तऐवज होते.

वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रांसाठी हैदराबाद येथे पथक पाठविले आहे. या संदर्भात अधिकाधिक पुरावे गोळा करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. - हरिभाऊ खाडे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड