शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील पाच गावांत भगरीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:30 IST

दीडशे किलो भगर प्रशासनाकडून जप्त 

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील कोपरा येथील एकाच कुटुंबातील १४ जणांना विषबाधा

अंबाजोगाई (जि. बीड) : तालुक्यातील देवळा, सारसा व आपेगाव येथील तीन कुटुंबातील बारा जणांना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली होती. त्यानंतर तालुक्यातील सौंदना येथील एकाच कुटुंबातील आठ जणांना तसेच गेवराई तालुक्यातील कोपरा येथील एकाच कुटुंबातील १४ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सौंदना येथील फड कुटुंबियांनी गावातीलच दुकानातून भगर खरेदी केली होती. ती खाल्यानंतर कोमल फड, भाग्यश्री फड, सुग्रीव फड, दत्ता फड , गोविंद फड, कमलाबाई फड, लक्ष्मी फड, महादेव फड अशी विषबाधा झालेल्या रूग्णांची नावे असून सर्व जण ३० ते ६२ वयोगटातील आहेत. स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान गेवराई तालुक्यातील कोपरा येथील एकाच कुटुंबातील १४ जणांना भगरीची भाकर खाल्ल्यामुळे शुक्रवारी विषबाधा झाली. सर्वांना सायंकाळी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाकडून कारवाईअन्न व औषध प्रशासनाने सौंदना येथील किराणा दुकानातून भगरीचे नमुने घेतले असून दुकानातून दीडशे किलो भगर जप्त केली आहे. आपेगाव , देवळा, सारसा येथील विषबाधा झालेल्या रु ग्णांनी सुद्धा लातूर तालुक्यातील सारसा येथून भगर खरेदी केली होती. सौदणा व सारसा येथील किराणा दुकानदारांनी लातूर येथील मे. अमितकुमार अँड कंपनी येथून भगर खरेदी केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी अनिकेत भिसे यांनी दिली.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाBeedबीडMahashivratriमहाशिवरात्री