शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अन्न, औषध प्रशासनाकडून ज्यूस बार, रसवंतीची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:29 IST

जिल्ह्यात खाद्य बर्फाच्या एकाही कारखान्याला मंजुरी नसताना सर्रास ज्यूस, रसवंतीगृहातून सर्रास अप्रमाणित बर्फ वापरण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न प्रशासनाने जिल्हाभरात झाडाझडती सुरु केली आहे.

ठळक मुद्देआंबे पिकविण्यासाठी कार्बाईडऐवजी इथेपॉनचा मर्यादित वापराचा सल्ला

बीड : जिल्ह्यात खाद्य बर्फाच्या एकाही कारखान्याला मंजुरी नसताना सर्रास ज्यूस, रसवंतीगृहातून सर्रास अप्रमाणित बर्फ वापरण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न प्रशासनाने जिल्हाभरात झाडाझडती सुरु केली आहे. पाच ठिकाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषिकेश मरेवार यांनी दिली.जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना उन्हापासून बचावासाठी थंडपेयांबरोबरच लिंबू सरबत, ऊसाचा रस, फळांचे ज्यूस, ताक, आईसगोळा इ. च्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. बर्फ टाकून या पदार्थांची विक्री होत असून शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिकांमधूनही याची मागणी वाढली आहे. परंतु, जिल्ह्यात खाद्य बर्फाच्या एकाही कारखान्याला अन्न प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नसल्याताना सर्रास अप्रमाणित बर्फ वापरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. विशेषत: जिल्ह्यातील बस स्थानकांच्या तसेच शहरांमधील वर्दळीच्या भागातील रसवंती, ज्यूस बारमध्ये बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या बाबीकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.उन्हाळ्याच्या अनुषंगाने जिल्हाभरात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून ज्यूसबारसह इतर काही ठिकाणी तपासणी मोहीम सुरु केली आहे. यामध्ये पाच ठिकाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दुकानदार, व्यापाऱ्यांनाही याबाबत सजग करण्यात येत असल्याचे अन्न प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन भिसे, मरेवार यांनी केले आहे.आंब्यांच्या साठ्यांचीही पाहणीआंबे व फळे पिकवण्यासाठी कार्बाईड गॅसचा अथवा पावडरचा वापर रोखण्यासाठीदेखील मोहीम हाती घेण्यात आली आहे. आंब्याच्या साठ्यांना भेट देत व्यापाऱ्यांना कार्बाइड ऐवजी प्रमाणित केलेल्या इथेपॉन पावडरचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग