शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथक तपासणार चारा छावण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:22 IST

जिल्ह्यातील चारा छावण्यांचा आकडा वाढल्यामुळे व यापुर्वी चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यामुळे चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावण्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचा निर्णय : चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी मोहीम

बीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांचा आकडा वाढल्यामुळे व यापुर्वी चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यामुळे चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावण्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.चारा छावणी चालकांकडून शासन नियमांनुसार कार्यवाही होण्यासाठी तसेच छावण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भरारी पथक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहे.तपासणी पथकामध्ये अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे हे प्रमुख असून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष पालवे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नागनाथ पानढवळे व नायब तहसीलदार संतोष धर्माधिकारी हे सदस्य असतील. जिल्हयात ८५९ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी ३२० चारा छावण्या प्रत्यक्षात चालू झालेल्या आहेत. या छावण्यांमध्ये पशुधनाचा विचार करता शेतकऱ्यांची जनावरे आहेत किंवा नाही, चारा छावणीतील जनावरांची संख्या, शासकीय नियमानुसार सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे.तहसीलदारांना सूचनाविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा दौऱ्यावर चारा छावणी बाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने चारा छावणीतील जनावरांची संख्या ३००० ही कमाल मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत तेथे दुसरी छावणी सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये.गावातील पशुधन व उपलब्ध चारा व चारा छावणीची आवश्यकता याबाबत विचार करुन कार्यवाही करावी. चारा छावणीतील जनावरांना चांगला आहार, पाणी मिळावे यासाठी नियमित तपासणी केली जावी.आठवडयातून एक वेळ अचानक भेट देऊन तपासणी केली जावी. तसेच चारा छावण्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र