शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यातील सोयाबीन पावसाअभावी कोमेजू लागले - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

माजलगाव : कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले. तालुक्यात वेळेत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा ...

माजलगाव

: कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले. तालुक्यात वेळेत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा झाला; परंतु मागील तीन आठवड्यांपासून पावसाचा थेंबही नसल्याने सोयाबीनची फुले कोमेजू लागली आहेत.

माजलगाव तालुक्यात मागील ५-६ वर्षांपासून कापसाचे क्षेत्र घटले. सोयाबीनच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होत असे; परंतु हे पीक खर्चिक होत चालल्याने शेतकरी कमी खर्चात चांगले उत्पन्न असलेल्या सोयाबीनकडे वळले.

गेल्यावर्षी माजलगाव तालुक्यात कापसाचा पेरा ३० हजार हेक्‍टर, तर सोयाबीन २३ हजार हेक्टरवर होते. गेल्यावर्षी सोयाबीनला ९ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने यावर्षी कापसाच्या पेरा कमी होऊन ते २७ हजार हेक्टर झाला, तर सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन २८ हजार हेक्टर झाले.

सोयाबीनला वेळोवेळी पाऊस राहिला, तर सोयाबीनचे पीक अतिशय जोमात येते; परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यास सोयाबीनला चांगलाच फटका बसतो. मागील तीन आठवड्यांपासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने जोमात आलेली व सध्या फुले लागत असलेल्या सोयाबीनला चांगलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, कडक उन्हामुळे सोयाबीनची फुले कोमेजू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन सुकू लागले आहेत. जोमात आलेले पीक पाण्यामुळे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात कमालीचे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीनला पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत.

सध्या सोयाबीनचे पीक जोमात असून त्याला पाऊस नसल्याने या पिकाला धोका निर्माण झाला आहे. सध्या हलक्‍या जमिनीतील सोयाबीन सुकू लागले असून, काळया जमिनीतील सोयाबीनला अद्याप काही फरक पडलेला नाही. १३ तारखेनंतर पावसाची शक्यता असून, तो पडल्यास सोयाबीनला चांगलाच फायदा होईल.

--- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव