शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आईसह पाच वर्षांच्या मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला तिचा पाच वर्षांचा मुलगा नदीकाठी खेळत असताना त्याचा तोल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला तिचा पाच वर्षांचा मुलगा नदीकाठी खेळत असताना त्याचा तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. यानंतर तो बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी आईने नदीपात्रात उडी घेतली. मात्र या घटनेत आईसह मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे गोदावरी नदीपात्रात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पल्लवी गोकुळ ढाकणे (वय २६) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (वय ५, दोघे रा.संगम जळगाव) अशी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत.

संगम जळगाव हे गोदावरी नदीकाठी असलेले गाव आहे. दरम्यान, पल्लवी ढाकणे या नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गोदापात्रात गेल्या होत्या. सोबत पाच वर्षांचा समर्थही गेला होता. पल्लवी या धुणे धुण्यात व्यस्त असताना नदीकाठी खेळणारा समर्थ अचानक पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता. यावेळी त्याला वाचविण्यासाठी पल्लवी ढाकणे यांनीदेखील गोदापात्रातील पाण्यात उडी मारली. दरम्यान, गोदापात्रात धुणे धुणाऱ्या काही महिलांनी आरडाओरड करीत गावाकडे धाव घेऊन मदतीसाठी आवाहन केले. मात्र गावातील तरुण येईपर्यंत पल्लवी पल्लवीसह त्यांचा पाच वर्षांचा समर्थ या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.

...

मातृदिनी घडली घटना

रविवारी जागतिक मातृदिन होता. दरम्यान, या दिवशीच आपल्या चिमुकल्या मुलाला बुडताना पाहून स्वतःला पोहता येत नसतानादेखील पल्लवीने नदीपात्रात उडी घेऊन आपल्या पाच वर्षांच्या समर्थला वाचविण्यासाठी धडपड केली. मात्र या दुर्दैवी घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मातृदिनी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

....

===Photopath===

090521\img-20210509-wa0189_14.jpg