जिल्ह्यात शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाल्यानंतर शनिवारी आणखी पाच मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात अंबाजोगाई शहरातील ६४ वर्षीय पुरुष, ८० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, याच तालुक्यातील ममदापूर येथील ६५ वर्षीय पुरुष आणि केज तालुक्यातील आडस येथील ७९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच शनिवारी ४७३ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ४४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २८ नवे रुग्ण निष्पन्न झाले. नव्या बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १४, आष्टी ३, बीड ६ तसेच धारुर, गेवराई, केज, परळी व शिरुर तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार १४९ इतकी झाली आहे. पैकी यापैकी १७ हजार ३८७ कोरोनामुक्त झाले असून ५६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे पाच बळी, २७ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST