शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक वापरल्याप्रकरणी परळीत पाच व्यापाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:22 IST

महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही परळीतील काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील पाच व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पथक व परळी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही परळीतील काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील पाच व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पथक व परळी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. पाच व्यापा-यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्रीय अधिकारी मातेकर व परळी पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी शहरातील काही दुकानांची तपासणी केली असता परळीतील मधुसूदन ड्रेसेस, गुरुकृपा ट्रेडर्स, गणेश प्रोव्हीजन, परिवार प्रोव्हीजन, पार्श्वनाथ ट्रेडर्स हे पाच व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले.शासनाच्या नियमानुसार या व्यापाºयांवर कार्यवाही करण्यात येवून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कार्यवाही आता नियमित चालू राहणार असून परळीतील व्यापाºयांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये अन्यथा अशा प्रकारची दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी म्हटले आहे.या पथकात परळी न.प.चे कार्यालयीन अधीक्षक दिलीप रोडे, स्वच्छता निरीक्षक संजय जुजगर, किरण उपाडे, व्ही.बी.दुबे, एम.आर.घुगे, एस.पी. डहाळे, अशोक दहीवडे विकास जगतकर, विलास केदारी, राजाभाऊ जगतकर, रमेश सवादे, कुलकर्णी, विकास मुंडे, शरनम ताटे व इतर कर्मचारी सहभागीहोते.

टॅग्स :BeedबीडPlastic banप्लॅस्टिक बंदी