शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'फिरू नकू दादा, ही बिमारी पडली भारी'; बीडच्या संगीतकाराची 'रॅप'च्या माध्यमातून 'ब्रेक द चैन' ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 13:07 IST

Rap song on Corona virus break the chain निष्काळजीपणा करणाऱ्यांना रस्त्यावर उभे राहून पोलीस ' दादा , तुम्ही घरात बसा ना'  हा संदेश जनतेला देत आहेत.

ठळक मुद्देहे रॅप बीडचे संगीतकार शैलेंद्र निसर्गंध यांनी लिहिले असून गायले सुद्धा आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांची सकारात्मक भूमिका आणि तळमळ मांडली

- अनिल भंडारी

बीड : 'ब्रेक द चैन' ही नागरिकांना हाक देत बीडचे संगीतकार शैलेंद्र निसर्गंध आणि सहकाऱ्यांनी मराठमोळ्या रॅप साँगची निर्मिती केली आहे. या रॅपच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणा-या लोकांमुळे कोरोनाची साखळी लवकर तुटत नाही आणि यामुळे लॉकडाऊन वाढत आहे, हे कळूनही निष्काळजीपणा करणाऱ्यांना रस्त्यावर उभे राहून पोलीस ' दादा , तुम्ही घरात बसा ना'  हा संदेश जनतेला देत आहेत. या आशयाचं हे रॅप अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

यावर्षीच्या लॉकडाउन काळामध्ये पोलिसांची संयमी भूमिका सर्वत्र पाहायला मिळाली. अनेकदा सांगूनही परिणाम होत नसेल तर त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते. पण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांची सकारात्मक भूमिका आणि तळमळ आम्ही या रॅपद्वारे मांडली असून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यातून करण्यात आले आहे. 

हे रॅप बीडचे संगीतकार शैलेंद्र निसर्गंध यांनी लिहिले असून गायले सुद्धा आहे. त्यांना गायिका सत्वशिला जाधव यांनी साथ दिली आहे. तसेच निळुभाऊ सावरगेकर, श्रद्धा कुर्हाडे, शुभम गवळी, नितिन धन्वे, अंकुश जाधव, अमित पवार, प्रल्हाद आव्हाड या बीडमधीलचा कलाकारांच्या यात भुमिका आहेत. तसेच व्हिडिओ निर्मिती अंकुश जाधव  यांनी केली असून अक्की सोनवणे बप्पा जगताप, अमित पवार, हनूमान बोबडे, संभाजी जोगदंड, अमर शिनगारे या सर्व टिमचे सहकार्य लाभले आहे. पोलिसांची तळमळ मांडणाऱ्या या व्हिडिओची संकल्पना सांगताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे  निरीक्षक साबळे, बाळू गुंजाळ ,बाबू तांदळे यांनीही तत्परतेने आवश्यक ते  सहकार्य केल्याचे शैलेंद्र निसर्गंध त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी येथील शैलेंद्र निसर्गंध अलीकडच्या काही वर्षात प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करीत त्यांनी ओठांवर रेंगाळणारी गीते निर्मिती करून संगीतबद्ध केली. बीड येथे झालेल्या वृक्ष संमेलनात झाडच विठ्ठल माझा झाडच रखुमाई ओसाड माळरानावर सह्याद्री देवराई, या गीताच्या माध्यमातून झाडाचा महत्त्व सांगणारे गाणे,  मागील वर्षी लॉग डाऊन काळांमध्ये सामान्य घटकांचे झालेले हाल टिपताना देव माझा रुसला या व्हिडिओ निर्मितीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. समाजाला संदेश देणारा निसर्गंध यांचा दादा तुम्ही घरात बसा ना या व्हिडिओलाही सोशल मिडीयावर सर्वांच्या पसंतीला उतरले असून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या