शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात माजलगाव शहरात रस्त्यासह घरांत पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

माजलगाव : शहरात नगरपालिकेद्वारे मान्सूनपूर्व कामे होणे अपेक्षित असताना नगरपालिकेने त्यास बगल दिली. यामुळे सोमवारी संध्याकाळच्या दरम्यान अर्धा तास ...

माजलगाव : शहरात नगरपालिकेद्वारे मान्सूनपूर्व कामे होणे अपेक्षित असताना नगरपालिकेने त्यास बगल दिली. यामुळे सोमवारी संध्याकाळच्या दरम्यान अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने अनेक भागांत अनेकांच्या घरात व दुकानांत पाणीच पाणी झाले होते.

माजलगाव नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर देऊनही शहरातील अनेक भागातील नाल्या अद्याप काढलेल्याच नाहीत. असे असताना संबंधित ठेकेदाराला नगरपालिकेचे पदाधिकारी ना मुख्याधिकारी त्यास काही बोलतात. त्याचाच गैरफायदा संबंधित ठेकेदार घेत असताना दिसत आहे. यामुळे शहरातील नाल्या जागोजागी तुंबल्याने भर उन्हाळ्यामध्ये नाल्यांचे पाणी रस्त्यावरून जाताना दिसत होते.

पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेकडून एप्रिल-मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे होणे आवश्यक होते. पावसाळा सुरू व्हायला केवळ आठ दिवस बाकी आहेत.

सोमवारी माजलगाव शहरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. नाल्या तुंबलेल्या असल्याने व पहिलाच पाऊस जोरदार झाले हे सर्व पाणी नाली वाटेन जाता रस्त्यावरून वाहत होते. शहरातील मठगल्ली, मशीद चौक, गोंदणी चौक, झेंडा चौक भागातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी वाहत होते. त्यामुळे या भागातील अनेक घरांत घाण पाणी गेल्याने घरात घाण साचून दुर्गंधी पसरली होती.

आंबेडकर चौकातून मोंढयात जाणाऱ्या रस्त्यांवरदेखील अनेक महिन्यांपासून पाणी साचत असताना नगरपालिकेने याकडे साधे लक्षदेखील दिले नाही. दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी पाण्यात बसून आंदोलन केली असतानादेखील नगरपालिकेला जाग आली नाही. नगरपालिकेच्या चुकीमुळे सोमवारी पडलेल्या पावसात या भागातील आणि दुकानात पाणी गेल्याने अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरू केलेली नाहीत. येत्या दोन दिवसांत मान्सून पूर्व कामाला सुरुवात करण्यात येईल.

--विशाल भोसले , मुख्याधिकारी न. प. माजलगाव

===Photopath===

010621\camscanner 06-01-2021 155412_1_14.jpg~010621\purusttam karva_img-20210531-wa0026_14.jpg