धारूर : तालुक्यातील सिंगणवाडीजवळ मोहखेड ते आडस रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने डोंगर परिसरातील झाडे व गवत जळून राख झाले. दरम्यान पसरणारी आग येथील तरूणांनी तात्काळ अटोक्यात आणल्याने वनविभागाच्या जमिनीतील झाडे वाचली. मोहखेड ते आडस रोड सिंगणवाडी पाटीजवळ उखळदऱ्याच्या माथ्यावर अज्ञात इसम आग लावून पसार झाला. आगीचे लोळ दिसताच नानासाहेब भोसले ,बालासाहेब भोसले, सचिन इंगोले, श्रीनिवास माचवे , अजय वाशिबे व परिसरातील शेतकरी व तरुण धावत गेले व त्यांनी आग अटोक्यात आणली. या आगीत डोंगरावरील झाडे ,झुडपे जळून खाक झाली. शेतकरी व तरूणांनी आग विझवली आग विझली नसती तर वनविभागाचे दोनशे एकर वन जळाले असते, असे बोलले जात होते.
===Photopath===
230321\img-20210323-wa0131_14.jpg~230321\img-20210323-wa0129_14.jpg