शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल; पोलीस निरीक्षकावरचा 'हल्लाबोल' आला अंगलट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:29 IST

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देभाजप, शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा राज्यभर सुरू आहे. १७ जानेवारी रोजी ही यात्रा बीड जिल्ह्यात होती. याच सभेत रेखा फड यांचेही भाषण झाले. बोलत असताना त्यांनी गुन्ह्यांचा तपास लावत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत.तसेच केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे विकाऊ असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले.पोलिसांनी याची गंभीर  दखल घेत चौकशी करून शुक्रवारी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

बीड : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

भाजप, शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा राज्यभर सुरू आहे. १७ जानेवारी रोजी ही यात्रा बीड जिल्ह्यात होती. बुधवारी दुपारी पाटोदा येथे सभा झाल्यानंतर रात्री बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात सभेचे आयोजन केले होते. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक, माजी मंत्री तथा आ.राजेश टोपे, चित्रा वाघ, संदीप क्षीरसागर, रेखा फड यांची उपस्थिती होती. 

याच सभेत रेखा फड यांचेही भाषण झाले. बोलत असताना त्यांनी गुन्ह्यांचा तपास लावत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत. तसेच केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे विकाऊ असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. भर सभेत पोलीस अधिकार्‍यांबद्दल असे अपशब्द वापरल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी याची गंभीर  दखल घेत चौकशी करून शुक्रवारी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सरकारविरोधात भांडत असताना रेखा फड यांनी पोलिसांबद्दल अपशब्द उच्चारून नवा वाद निर्माण केला आहे. सध्या पोलीस दलात त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करीत आहेत.

आरोपीविरोधात कठोर कारवाई करू तपास अधिकारी मा.न्यायालयाला पत्र लिहून प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात परवानगी मागतील. न्यायालयाचे आदेश मिळताच आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून रेखा फड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या फिर्यादीत पोलीस अधीक्षक यांना धमक्या दिल्याचाही उल्लेख आहे, हे सुद्धा खरे आहे. आमचा तपास सुरू आहे. लवकरच तो पूर्ण करू.- सय्यद सुलेमान, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड