शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनीच लावल्या तलाठी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:30 IST

किरायाच्या इमारतीमुळे महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नसल्याचे स्प्ष्टीकरण संबंधित तलाठ्याने दिले आहे.

- नितीन कांबळे कडा (बीड ) :  महापुरुषांच्याऐवजी स्वतःचा फोटो कार्यालयात लावलेल्या तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला आहे. मात्र, त्यांना शासकीय कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा विसर संबंधित तलाठ्यांना पडला होता. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने महापुरुषांच्या प्रतिमा आज तलाठी कार्यालयात लावल्या आहेत. 

शासकीय असो कि निम शासकीय कार्यालय असो प्रत्येक ठिकाणी महापुरुषांचे फोटो कार्यालयात असणे बंधनकारक आहे, असे असताना तलाठी अरुण मोरे यांनी एकाही महापुरुषाचा फोटो कार्यालयात लावला नाही. उलट महापुरुषांऐवजी मोरे यांनी चक्क स्वतःचाच सैनिकी गणवेशातीला फोटो कार्यालयात लावल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने समोर आणला होता. चार दिवसानंतर तलाठी मोरे यांनी स्वतःचा फोटो कार्यालयातून काढला. परंतु, त्यांना कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा विसर पडला. 

आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयाला भेट दिली असता एकाही भिंतीवर महापुरुषांच्या प्रतिमा आढळून आल्या नाहीत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, समाजसेवक विजय डुकरे, दिपक जाधव, मंगेश खिलारे, विजय साखरे यांनी स्वखर्चाने महापुरुषांच्या प्रतिमा तलाठी कार्यालयात लावल्या. तसेच कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या या मुजोर तलाठ्यावर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी केली आहे.

किरायाच्या इमारतीमुळे लावल्या नाहीत प्रतिमा तालुक्यातील टाकळसिंग सज्जाचे कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आहे. येथे अरुण मोरे हे तलाठी कार्यरत आहेत. या सज्जा अंतर्गत हिंगणी, पिंपळ सुट्टी, वाकी, टाकळसिंग अश्या गावाचा समावेश आहे. दरम्यान, कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा का लावण्यात येत नाहीत याबाबत तलाठी अरूण मोरे यांना विचारले असता त्यांनी, कार्यालयाची इमारत भाडोत्री असल्याने महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नाहीत, असे स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा :- अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर- महापुरुषांऐवजी कार्यालयात लावला चक्क स्वतःचाच फोटो; बीड जिल्ह्यात तलाठ्याचा प्रताप

टॅग्स :BeedबीडRevenue Departmentमहसूल विभाग