रुक्माबाई रामहारी घुले यांच्या धारूर पोलीस ठाण्यातील फिर्यादीवरून रामहारी घुले (वय ४५, रा. टाकळी घुले, ता. केज) असे मृताचे नाव आहे. मृताच्या पत्नीचे व पिनू ऊर्फ वचिष्ट लाला तांदळे (रा. फक्राबाद, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) याचे अनैतिक संबंध होते. याला रामहारी घुले यांचा विरोध होता. दरम्यान, विरोध केल्याने तांदळे याने रामहारी घुले यांना अनेकवेळा मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून रामहारी यांनी विषारी द्रव प्राशन केले. उपचारांदरम्यान रामहारी यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर रुक्माबाई यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात ५ मार्चला पिनू ऊर्फ वचिष्ट तांदळे विरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक संबंध ठेवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST