शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:13 IST

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी मयताच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच संबंधित चार पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचाही आदेश दिला.

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठाचे आदेश ; पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू प्रकरण

औरंगाबाद / बीड : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. व्ही. के. जाधव यांनी मयताच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच संबंधित चार पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचाही आदेश दिला.

मयत शेख मोहम्मदच्या नातेवाईकांनी अ‍ॅड. सईद शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार मयत शेख मोहम्मद हा केज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहे. तो २६ आॅगस्ट २०१५ रोजी सकाळी ७ वाजता घरातून कामासाठी बाहेर पडला. पोलिसांनी आरोपीला केज सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती त्याच्या भावाला दुपारी एक वाजता मिळाली.

तसेच तो गंभीर जखमी अवस्थेत असल्याचेही समजले. त्याचा भाऊ व नातेवाईक दवाखान्यात पोहोचले. त्यावेळी पोलीस आरोपीला अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्याच्या तयारीत होते. आरोपी हा बेशुद्ध होता. त्याच्या नाक, कान व तोंडातून रक्त वाहत होते. अंबाजोगाईला पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मोहम्मद मयत झाल्याचे घोषित केले. त्याविरोधात सदर याचिका दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीला त्याच्या गावी घेऊन जातांना, त्याने चालत्या गाडीतून उडी घेतल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु नातेवाईकांना पोलिसांच्या भूमिकेवर संशय आला. त्यांनी संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. ही मागणी पोलिसांनी फेटाळली व प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविल्याचे सांगितले.

सुनावणीअंती आरोपीला दिलेल्या अमानवीय वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून खंडपीठाने पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. पोलीस शिपाई शंकर राठोड, राजाराम फुफाटे, नारायण मिसाळ व पोलीस चालक येवले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी बचावासाठी सांगितलेला घटनाक्रम व प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाबावरही खंडपीठाने साशंकता व्यक्ती केली.

पोलीस शिपायाकडून दिशानिर्देश व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघनया गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तातडीने सोपवावा. सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांनी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडून या मृत्यूप्रकरणाची चौकशी करावी व पंधरा दिवसांमध्ये अहवाल मागवावा. चार महिन्यांत या संपूर्ण प्रकरण निर्णयाप्रत न्यावे. तपास अधिकाºयांना या प्रकरणात व्याप्ती वाढविण्याचे व संबंधित इतर व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्याची मुभाही खंडपीठाने दिली आहे.पोलीस शिपाई शंकर राठोड याने आरोपीला ताब्यात घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देश व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरोधात खंडपीठाचे रजिस्टार (न्यायिक) यांनी सुमोटो अवमान प्रक्रिया सुरू करावी, असेही निकालात स्पष्ट केले. अ‍ॅड. शेख यांना अ‍ॅड. महेश भोसले व अ‍ॅड. क्यू. आर. सय्यद यांनी सहकार्य केले.