शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पोलीस उपअधीक्षक जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीस बेदम मारहाण करून अर्वाच्च भाषेत व जातीवर शिव्या दिल्या. या घटनेचा निषेध नोंदवत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करा, या मागणीसाठी बुधवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवार रोजीही सुरूच होते.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना जि. प. सदस्य राजेसाहेब देशमुख म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करावेत व त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मराठा क्रांती मोर्चाची प्रमुख मागणी आहे. या प्रकरणात चौकशीच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने विलास यादव यांना नाहक मारहाण केली आहे, हे योग्य नाही.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माधव जाधव यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी सुरू झालेले ठिय्या आंदोलन गुरुवार रोजीही सुरूच होते. मागण्या मान्य केल्याशिवाय व यादव कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. गुरुवारपासून आजुबाजूच्या गावातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. या आंदोलनाची व्याप्ती आता आणखी वाढली असून अंबाजोगाई तालुक्यासह आजुबाजूच्या तालुक्यातील कार्यकर्ते देखील ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत, असे समन्वयक जाधव म्हणाले.

केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांना दिली. गृहमंत्री यांनी कार्यवाहीचे आश्वासन देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन दिली.

या आंदोलनात गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अ‍ॅड. माधव जाधव, नंदकिशोर मुंदडा, अशोकराव देशमुख, अशोक गुंजाळ, राजेसाहेब देशमुख, नगरसेवक बबन लोमटे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंत मोरे, नगरसेवक सारंग पुजारी, डॉ. नंदकिशोर सोमवंशी, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. अजित लोमटे, आबासाहेब पांडे, महेश लोमटे, प्रा. प्रशांत जगताप, संजय भोसले आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

९ जुलै रोजी तळेगाव घाट, हातोला आणि बर्दापूर तसेच १० जुलै रोजी जवळगाव, पुस, गिरवली, धायगुडा पिंपळा आणि मगरवाडी येथील मराठा समाजबांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा, वंचित बहुजन आघाडी, क्षत्रीय मराठा, महाराष्ट्र कुणबी मराठा महासंघ, अखिल भारतीय किसान काँग्रेस आणि लोकजनशक्ती पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील बीड, परळी, धारूर येथेही गुरुवारी याप्रश्‍नी प्रशासनास निवेदने देण्यात आली.

080721\avinash mudegaonkar_img-20210708-wa0091_14.jpg