शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या भीतीने राजापूरकरांची आठवड्यापासून झोप उडाली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

राजेश राजगुरू तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा ...

राजेश राजगुरू

तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा संपेपर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

याच भीतीने तालुक्यातील राजापूर येथील ग्रामस्थ झोपलेच नाहीत. या परिसरात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. राजापूरच्या उत्तर बाजूने गोदावरी नदी वाहते, तर उर्वरित सर्व बाजूंनी नदीनाल्यांनी गावाला घेरलेले आहे. गोदावरीला पूर असो किंवा नसो, पण थोडा जरी पाऊस पडला की या ओढ्यानाल्यांना पूर येऊन गावाचा संपर्क तुटतो.

गावातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर एक नदी व एक नाला आडवा येतो. यातील नाल्यावरील पुलावरून पूर्ण पावसाळाभर पाणी वाहत असल्यासारखेच असते. त्यात थोडा जास्त पाऊस झाला की या नाल्यावरील पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह वाहत असतो. त्यामुळे पावसाळ्यात गोदाकाठावरील राजापूर या गावांतील लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दररोज मुसळधार पाऊस पडत असल्याने आठ दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटल्यातच जमा आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक पाणीपातळी वाढून पूर येतो की काय या शंकेने या गावातील पुरुष, महिला, मुलांबाळासह रात्र जागून काढत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या गावातील लोक झोपलेच नाहीत.

गावातून बाहेर निघण्यास रस्ता नाही. त्यात पाऊस चालू असतो आणि अचानक पाणीपातळी वाढली तर काय करायचे? या विचाराच्या तंद्रीत गावातील सर्वच लोकांची आठ दिवसांपासून झोप उडाली आहे.

कायम पुनर्वसन करण्याची मागणी

राजापूर हे गाव थोडा पाऊस आला तरी चोहोबाजूंनी पाण्याने घेरले जात असते. ही स्थिती प्रत्येक पावसाळ्यात असते. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

अर्धा तास पाऊस झाला तरी तुटतो संपर्क

तलवाडा मंडळात ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान या मंडळातील नागरिकांना दोन वेळा अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. अर्धा तास पाऊस झाला तरी राजापूरचा संपर्क तुटतो. पुरानंतर आता साथरोग पसरू लागले असून, आरोग्य यंत्रणेने दक्ष राहण्याची गरज आहे. तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी खचलेल्या पुलामुळे अडचणी निर्माण झाल्याने तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे.

090921\09bed_8_09092021_14.jpeg

राजापूर येथील संपर्क तुटला असून पुराची भीती कायम आहे.