शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या भीतीने कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:31 IST

परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. जलयुक्तची कामे न करता बिले उचलल्यानंतर बिंग फुटू नये म्हणून ती अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा धडाका कंत्राटदारांनी लावला आहे. मात्र, परळी तालुक्यातील डाबी, वानटाकळी या गावातील नागरिकांनी या कामातील भ्रष्टाचार व शेतामध्ये पिके उभी असल्यामुळे जलयुक्तच्या सध्या होणाऱ्या कामांना विरोध सुरू केला आहे.

ठळक मुद्दे‘जलयुक्त’च्या कामांना डाबी, वानगावकरांचा विरोध : कामे न करताच उचलली बिले; ५७६ कामांची होणार चौकशी

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. जलयुक्तची कामे न करता बिले उचलल्यानंतर बिंग फुटू नये म्हणून ती अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा धडाका कंत्राटदारांनी लावला आहे. मात्र, परळी तालुक्यातील डाबी, वानटाकळी या गावातील नागरिकांनी या कामातील भ्रष्टाचार व शेतामध्ये पिके उभी असल्यामुळे जलयुक्तच्या सध्या होणाऱ्या कामांना विरोध सुरू केला आहे.अंबाजोगाई व परळी तालुक्यात जलयुक्तची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा ठपका यापूर्वीच चौकशी समितीने ठेवलेला आहे. मात्र, कामे न करता ज्या कंत्राटदारांनी बिले उचलेली आहेत, त्यांचे मात्र चौकशी पथक येणार असल्याने धाबे दणाणले आहे. दक्षता पथकानेही तपासणी करून या कामांमध्ये अनियमितता असल्याचा अहवाल सादर केला होता.जलयुक्त शिवार योजनेतील सर्वच कामांची चौकशी होणार असल्याने तसेच विधिमंडळ अंदाज समिती ३० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येणार असल्यामुळे गैरकारभारावर पांघरूण घालण्यासाठी कंत्राटदारांकडून हा प्रकार होत असल्याची माहिती पुढे आली आहे. आधी बिले उचलली परंतु, न केलेली कामे करण्याचा घाट आता कंत्राटदार व अधिकाºयांनी घातला आहे.या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे गावकºयांना माहिती आहे व शेतात पिके उभी असल्यामुळे कामे करताना नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कामे करण्यास विरोध दर्शवित लेखी स्वरुपाची तक्रार कृषी विभागाकडे केल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांनी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न झालेली कामे कोणाच्या सांगण्यावरून सुरू करण्यात येत आहेत, याचीही चौकशी होणार असल्याचे समजते.जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचारप्रकरणी कृषी विभागातील २४ अधिकाºयांना निलंबित करण्यात आले होते. तसेच बोगस कामे करणाºया १३८ पेक्षा अधिक मजूर संस्थांसह व कंत्राटदारांवर गुन्हे नोंद झाले होते.सुप्रीम कोर्टाचाही दिलासा नाहीजलयुक्त शिवार भ्रष्टाचारप्रकरणी २४ अधिकारी निलंबित करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही अधिकाºयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.२१ आॅगस्ट रोजी २४ पैकी ६ अधिकाºयांना उच्च न्यायालयाने १ आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.पोलिसांकडून अभयभ्रष्ट अधिकाºयांना पाठिशी घालण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. पोलीस अधीक्षकांना भेटून भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांना अटक करण्यासाठी निवेदन दिले आहे. तरी देखील कुठलीही कारवाई झालेली नाही.हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे या प्रकरणात तक्रार करणारे महाराष्ट्र ओबीसी कॉग्रेस सेलचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवार