पुतण्या दीपकचा खून झाल्याने प्रकाश याने दिलेल्या फिर्यादीनुसार आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सत्र न्यायालय बीड येथे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले.
याप्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या.बीड-१ यू. टी. पोळ यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर साक्षीदारांच्या जवाबाचे अवलोकन न्यायालयाने केले. तसेच जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. बीड-१ यू. टी. पोळ यांनी आरोपी सत्यवान घोगरकर व मोहन घोगरकर यांना खूनप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी काम पाहिले, तर न्यायालयाचे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हे.कॉ. शिवाजी डोंगरे यांनी मदत केली.