शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रांना शेतक-यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:11 IST

बीड : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर उडीद, मूग व सोयाबीनची १७ दिवसात केवळ २९९० क्विंटल खरेदी ...

ठळक मुद्दे१७ दिवसात फक्त २९९० क्विंटल धान्याची खरेदी

बीड : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर उडीद, मूग व सोयाबीनची १७ दिवसात केवळ २९९० क्विंटल खरेदी झाली असून सरासरी दिवसाकाठी केवळ १७० क्विंटल इतकी कमी खरेदी झाली आहे. आॅनलाईन नोंदणी न केल्याने तसेच विविध कारणांमुळे शेतक-यांनी पाठ फिरविली असून शेतकरी केंद्रांवर का येईनात असा प्रश्न यंत्रणेलाही पडला आहे.

जिल्ह्यात हमीदराने खरेदीसाठी नाफेडच्या वतीने ३० आॅक्टोबरपासून अकरा केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर माल विकणा-या शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी आवश्यक आहे. या नोंदणीसाठी अर्ज दिल्यानंतर अ‍ॅपद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मात्र, अ‍ॅपची संख्या कमी असल्याने यात विलंब होत आहे. तर दुसरीकडे केंद्रावर माल विकण्यासाठी आर्द्रतेसह हेक्टरी मर्यादा निश्चित केली होती. शेतक-यांमधून ओरड सुरु झाल्यानंतर यात काही अंशी सुधारणा करण्यात आली. सरासरी कृषी पे-यानुसार हेक्टरी क्विंटल मर्यादा तसेच निश्चित केलेल्या उता-यानुसार विक्रीसाठी शिथीलता देण्यात आली. मात्र, नोंदणीअभावी अद्याप बहुतांश शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रापासून दूरच आहेत.

या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे जनरल मॅनेजर देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आॅनलाईन नोंदणीचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर किमान दहा मोबाईल अ‍ॅप नोंदणीसाठी उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी सिंग यांनी आदेश दिले.बीड केंद्रावर ३०१.३३, पाटोदा येथे ६८.९८, कडा येथे १०.३० तर माजलगाव येथे ८३८.७१ अशी चार केंद्रांवर उडीदाची १२१९.३२ क्विंटल खरेदी झाली आहे.मुगाची बीड येथे ६९.२४, गेवराईत ७३.३०, धारुरमध्ये १८.२५, माजलगावात ८७०.९१ तर पाटोदा केंद्रावर ४१८ याप्रमाणे पाच केंद्रांवर १०३५.८८ क्विंटल खरेदी झाली आहे. बीड केंद्रावर ६७.९६, गेवराईत ७३.३०, माजलगावात ६६०.७३ अशी तीन केंद्रावर सोयाबीनची ७३४.५९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.