शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी क्रांती दिनी बीडमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदालने करण्यात आली. मात्र ...

बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदालने करण्यात आली. मात्र अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे ९ ऑगस्ट रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘विमा मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी दिली.

शेतकऱ्यांना पीकविमा देण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा देण्यात आला नाही. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. या प्रकरणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १ नोव्हेंबर २०२० रोजी प्रत्येक तालुक्याच्या ग्रामपंचायतीवर विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. १ जून २०२१ रोजी महिला शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करून पीकविमा देण्याची मागणी केली. तसेच १ जुलै २०२१ रोजी जिल्ह्यातील एक गाव पूर्ण बंद ठेवून चूल बंद (अन्नत्याग सत्याग्रह) केला. तरीही अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विमा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे थावरे म्हणाले.

याचिका दाखल करणार : थावरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा देण्यास अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे आता उघडकीस आले आहे. यामुळे पीक विम्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती गंगाभीषण थावरे यांनी दिली.