शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका स्वाक्षरीअभावी शेतकऱ्यांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST

रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची नुकसान भरपाई मिळेना धारूर : खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी ...

रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची नुकसान भरपाई मिळेना

धारूर : खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदान रब्बी हंगाम संपला तरी खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बँकांना देण्यात येणाऱ्या धनादेशावर तहसीलदारांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खरीप हंगामात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. या मध्ये कापूस,तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतरही पिकांना या परतीच्या अतिवृष्टीचा फटका बसला होता. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झालेले आहे. परंतु दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील अनुदान तहसीलकडे वर्ग होऊनही ते अद्यापपर्यंत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. हे अनुदान खरीप हंगाम संपण्यापूर्वी देण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु रब्बी हंगाम उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळत नसल्याने सरकार आणि प्रशासनाविरुद्ध शेतकरी संतप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तहसीलकडे प्राप्त होऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. अद्यापपर्यंत तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी आलेल्या अतिवृष्टी अनुदानाच्या अंतिम धनादेशावर सही करायला वेळ मिळत नसल्यामुळे हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी बँकांना अनुदानासाठी देण्यात येणाऱ्या याद्या तयार केल्या आहेत. तहसीलदारांना अंतिम सही करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदार शिडोळकर यांच्याशी संपर्क साधत या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.