शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत; पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत अंबाजोगाई : मागील चार दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लगबग ...

हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत

अंबाजोगाई : मागील चार दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते आदींची खरेदी करून ठेवली. काहींनी पेरणी सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे हंगामासाठी पैसाच नाही. ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

परिणामी शेतकरी सावकाराच्या दारात पोहोचत आहेत. संधीचे सोने करण्यासाठी टपून बसलेल्या सावकारांना आता आयतेच सावज मिळू लागले आहे. शासनाच्या कर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांची गाडी रुळावर आली नाही. अनेकजण कर्जबाजारीच आहेत. त्यांना बँक कर्ज देत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतीच्या बी-बियाणे खरेदीसाठी सावकाराच्या दारात गेल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. सावजाच्या शोधात असलेले काही नियमित सावकार शेती गहाण केल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. तर काही सावकार सरळ विक्रीपत्र करून घेऊन पैसे देतात. ही गोष्ट सावकार व शेतकरी यांच्यातच अनेक दिवस गोपनीय राहते. कालांतराने ही प्रकरणे बाहेर येतात. दरवर्षी शेतकरी आपल्या व्याजासह हिशेब करून सावकाराचे कर्ज मोकळे करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आहे. पेरणीसाठी कृषी केंद्राकडून बी-बियाणे व खते या वस्तू नगदी घ्याव्या लागतात. हातात पैसा असला, तर हे सर्व ठीक आहे. मात्र हातात पैसे नसले तर शेतकऱ्यांची फजिती होते.

दागिने गहाण

अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच नाही, कसेही असले तरी पेरणी योग्यवेळी करावीच लागते. अशा वेळेस वाटेल ती तडजोड करून प्रसंगी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवले जातात. अशी पाळी सध्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.

बँका कर्ज देईनात

शासनाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पीक कर्ज कमी व्याजदराने देण्याची महत्त्वपूर्ण योजना सुरू केली; परंतु बँका शेतकऱ्यांना नियमबाह्य कागदपत्रे मागतात. अनेक शेतकऱ्यांना या कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नसते. अनेकांच्या शेतजमिनी अजूनही मृत वारसांच्याच नावे आहेत. तर अनेकांच्या जमिनीची फोड नाही. महसूल प्रशासनाकडे अशी अनेक प्रकरणे पडून आहेत. परिणामी शेतकरी या कागदपत्रांच्या भानगडीत न पडता थेट सावकारांचे घर गाठतो.