रविवारी संध्याकाळपासून गेवराई व तालुक्यात पावसाने दोन तास हजेरी लावली. अंबाजाेगाई तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी शहर व परिसरात दुपारी एक वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला तर सायंकाळीदेखील चांगली हजेरी लावली. बीड व तालुक्यातही सायंकाळी पावसाची झड सुरू होती. जिल्ह्यात २७ जूनपर्यंत सरासरी १४७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शिरसदेवी परिसरात पेरणीची लगबग
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु मृगाच्या उत्तरार्धात पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शिरसदेवीसह लोणावळा, मारफळा, वाहेगाव रूई, भेंडटाकळी, भेंड, सुल्तानपूर, तांडा, चिंचोली, रानमळा भाटेपुरी परिसरात पाऊस झाला. जमिनीत ओल खोलवर गेल्यामुळे शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, बाजरी, मका, कापूस, भुईमुगाच्या पेरणीला लागला आहे.
===Photopath===
270621\27_2_bed_32_27062021_14.jpg
===Caption===
शिरसदेवीत पेरणीची लगबग