शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर बनावट अकाऊंटमुळे वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

सायबर सेलकडे तक्रारी वाढल्या : फेक अकाऊंटवरून बदनामी करण्याचे प्रकार वाढले बीड : इंटरनेट स्वस्त झाल्यापासून सोशल मीडियाचा वापरदेखील ...

सायबर सेलकडे तक्रारी वाढल्या : फेक अकाऊंटवरून बदनामी करण्याचे प्रकार वाढले

बीड : इंटरनेट स्वस्त झाल्यापासून सोशल मीडियाचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात बनावट फेसबुक, इन्स्ट्राग्राम, किंवा इतर प्रोफाईल तयार करून पैशाची मागणी करणे, जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर लिहिणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील बनावट अकाऊंटमुळे डोकेदुखी वाढली आहे. असे बनावट अकाऊंट बंद करून कारवाई करण्यासाठी सायबर सेलकडील तक्रारी मागील काही वर्षात वाढल्या आहेत.

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी बसून होते. त्यामुळे या काळात व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचेदेखील समोर आलेले आहे. दरम्यान, या सोशल मीडियामुळे जसे अनेक फायदे झाले आहेत. तसेच याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. लॉकडाऊन काळात अडचणीत असल्याचे सांगून अनेकांना पैशाची मागणी करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तर, संबंधित व्यक्तीला आपले बनावट खाते तायर केले आहे याची कल्पनादेखील नसते. त्यामुळे अशा ठगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याप्रकरणाच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. त्याचसोबत जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश पाठवणे किंवा पोस्ट करणे अशा अकाऊंटचालकांवर देखील कारवाई केली जाते. यासाठी सायबर सेल २४ तास कार्यरत असते.

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

२०२१- ११०

२०२०- ८५

२०१९ -८०

कोरोना काळातमध्ये तक्रारी वाढल्या

कोरोनाच्या अगोदर सायबर सेलकडे फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ कमी होता.

परंतु गेल्या दीड वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या तक्रारीदेखील सायबरसेलकडे येत असून, त्याचा तपास केला जात आहे.

सात दिवसांत होते खाते बंद

सायबर सेलकडे सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक झाले असेल तर, त्याची तक्रार सायबर सेलकडे केली जाते. दरम्यान, या फेसबुक अकाऊंटची लिंक संबंधित कंपनीकडे पाठवली जाते. त्यानंतर सर्व पडताळणी करून ते बनावट सोशल मीडिया खाते बंद केले जाते. त्यामुळे पुढील काळात होणारी फसवणूक टाळण्यास मोठी मदत होते.

पोलिसांसाठी वेगळे पोर्टल

सोशल मीडियावरील अकाउंट हॅक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाल्यानंतर या विभागाच्या माध्यमातून ई-मेल आयडी व इतर माहिती घेऊन संबंधित व्यक्तीचा पासवर्ड परत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यानंतर तो पासवर्ड फॉरमॅट करण्यात येतो

जेणेकरून वापरकर्त्याला वेगळा पासवर्ड देऊन ते खाते वापरता येते. फेसबुककडे तक्रार करण्याऐवजी नागरिकांनी सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही केली जाते. यासाठी सायबर सेलकडे एक वेगळे पोर्टलदेखील असते. सायबर सेलमध्ये हॅकिंग व इतर किचकट प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासनातील तज्ज्ञ अधिकारी कर्मचारी यांची नियुक्त याठिकाणी करण्यात आलेली असते.

तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...

सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात फेसबुक किंवा इतर बनावट खाते उघडून गैरवापर केल्याचे प्रकार वाढेल आहेत.

विशेष करून फेसबुक संदेशाद्वारे अडचणीत असल्याचे सांगून पैशाची मागणी केली जात आहे. किंवा धार्मिक भावना दुखवणारे सतत चितावणीखोर लिखाण या माध्यमांमधून केले जात असेल, त्यासाठी बनावट खात्याचा वापर केला जात असेल असे लक्षात आल्यास त्याची तक्रार संबंधित पोलीस ठाणे किंवा सायबर सेलकडे तक्रार करता येते.

बीड सायबर सेलकडून असे बनावट अनेक सोशल मीडिया खाते बंद करण्यात आले आहेत. तर, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.