शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रशासन जागे झाले; सलग दुसऱ्या दिवशी प्रेत तहसील कार्यालयात ठेवल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 14:48 IST

शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही ऐरणीवर आला.

ठळक मुद्दे लिंगायत समाज स्मशानभूमी रस्त्याच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर सलग दुसऱ्या दिवशीही प्रेतयात्रा तहसील कार्यालयात

धारूर :  येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर आज सलग दुसऱ्या दिवशीही प्रेतयात्रा तहसील कार्यालयात थेट तहसीलदारांच्या दालनासमोर नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकाराने हादरलेल्या प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे.

शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही ऐरणीवर आला. काल दि.२७ गुरुवार रोजी तहसील कार्यालयात प्रेतयात्रा नेल्यानंतर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समजूत काढून प्रकरण शांत केले. यावेळी येत्या ३१ अॉगस्ट पर्यंत स्मशानभूमीचा रस्ता मोकळा करुन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू आज पुन्हा एक व्यक्ती मृत झाल्यानंतर स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्याचा प्रश्न पुढे आला. यामुळे संतापलेल्या समाज बांधवांनी सलग दुसऱ्या दिवशी प्रेतयात्रा तहसील कार्यालयात नेली. आज प्रेत थेट तहसीलदारांच्या दालनासमोरच ठेवण्यात आले. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले.

आक्रमक समाज बांधवानी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जोरदार मागणी करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस पोलिस ताफ्यासह तत्काळ तहसील कार्यालयात पोहोचल्या. यानंतर समाज बांधव, तहसील व पोलीस प्रशासन यांच्यात रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. शेवटचे वृत्त आले तेव्हा स्मशानभूमी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती.

इतर महत्वाच्या बातम्या : 

- अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून

- मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली 

- अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

टॅग्स :BeedबीडEnchroachmentअतिक्रमण