शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव, एक वाण’ मोहिमेअंतर्गत कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST

कृषी विभागाचा उपक्रम : शेतकऱ्यांना कापूस लागवडीसह बियाणे खरेदीसाठी मार्गदर्शन बीड : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ‘एक ...

कृषी विभागाचा उपक्रम : शेतकऱ्यांना कापूस लागवडीसह बियाणे खरेदीसाठी मार्गदर्शन

बीड : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ‘एक गाव, एक वाण’ अभियानांतर्गत ११ गावांची निवड करण्यात आली असून, गावांमध्ये एकाच वाणाचे कापूस बियाणे लागवड करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महाकॉट स्मार्ट कॉटन अभियानांतर्गत पिंपळनेर येथे कृषी विभागाच्यावतीने आयोजित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक गावात किमान पन्नास शेतकऱ्यांचे एक गट करून असे पाच गट स्थापन करण्यास सांगून, कापसाचे एक वाण लागवड करून दर्जेदार उत्पन्न घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, साळवे यांनी केले आहे. एकप्रकारचा आणि स्वच्छ कापूस कापड उद्योगाला उपलब्ध करून देणे, कापूस उत्पादनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग न राहता कापूस प्रक्रियेनंतर बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे आणि यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळवून देणे, असे विविध फायदे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर यांनी स्मार्ट कॉटन ‘एक गाव, एक वाण’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले; तर निवृत्त कृषी अधिकारी चांडक यांनी कापूस लागवडीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी पिंपळनेर गावातील प्रगतिशील शेतकरी तसेच नवीन तंत्रज्ञान अवलंब करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक वी. डी. सोनवतीकर, कृषी सहायक सी. एन. वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.

===Photopath===

030621\333203_2_bed_11_03062021_14.jpeg

===Caption===

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अधिकारी दिसत आहेत.