शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शरीराने जरी थकला, तरी मनाने खचू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

बीड : बुद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब सतत समाजकार्याकरिता व देश हितासाठी झटत होते. ते शरीराने जरी ...

बीड : बुद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब सतत समाजकार्याकरिता व देश हितासाठी झटत होते. ते शरीराने जरी थकले होते तरी मनाने न खचता समाज हिताचे कार्य करीत होते. त्यांचा हा आदर्श प्रत्येकाने नजरेआड न करता आपापल्यापरीने समाजसेवा करावी, असे आवाहन भन्ते धम्मशील यांनी संबोधित केले.

तालुक्यातील शिवणी येथे डॉ. भदंत आनंद कौशल्यायन नगरात प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्म वंदना, धम्म देसना तसेच वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत हाते. महावितरणचे अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप उपरे, उपकार्यकारी अभियंता चंद्रशेखर सानप व बसवराज हिप्परगे, आरटीओ संदीप खडसे आदी यावेळी उपस्थित होते.

‘शिका संघटित व्हा व संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेबांचा मोलाचा संदेश लक्षात ठेवून समाज प्रगतीकरिता कितीही अडचणी आल्या तरी एक दिलाने व एक विचाराने कार्य केल्याने त्या सोडविण्यास नक्कीच यश मिळते, असे मार्गदर्शन रवींद्र कोलप यांनी केले. प्रास्ताविकात प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी संस्थेची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खू धम्मशील यांच्या मार्गदर्शनातून होत असलेल्या कार्यामुळे धम्म वंदना कार्यक्रमात रवींद्र कोलप, संदीप उपरे व अमरसिंग ढाका यांनी आजीवन सभासदत्व स्वीकारले. यावेळी ‘वाचाल तर वाचाल’ या फिरते मोफत वाचनालयातर्फे पाच बोधीवृक्ष लावण्यात आली. १०० पुस्तकांचा संच २९ व्या शिवणी येथील केंद्रास वितरणासाठी उपासक राजेंद्र डोळस यांना सुपूर्द करण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी केले. वसंतराव तरकसे यांनी आभार मानले. प्रा.प्रदीप रोडे यांनी खीरदान केले.

===Photopath===

250621\25_2_bed_26_25062021_14.jpg

===Caption===

धम्मदेसना