शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यानंतरही मांजरा धरणात केवळ ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात फक्त ३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात आणखी मोठ्या पावसाची गरज असून प्रकल्पात फक्त ३१.८३ टक्के इतका जिवंत साठा आहे.

या वर्षी पावसाळ्यात सर्वत्र मोठा पाऊस झाला. तीन महिने लोटली तरी मांजरा धरणाचा पाणीसाठा वाढलेला नाही. मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्पाची पाणी पातळी ६३८. ३३०मीटर आहे. सर्व शहरांसाठी प्रति महिना ३ दलघमी पाणी उचलले जाते. अंबाजोगाई शहरात किमान आठ दिवसाआड पाणी देण्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने दोनदा भरले आहे. यावर्षी ऑगस्ट खेर फक्त चोवीस दलघमी नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसावरच सर्व काही अवलंबून आहे. पिण्यासाठी मुबलक आणि शेतीला जेमतेम पाणी मिळण्यासाठी मोठ्या पावसाकडे अंबाजोगाईकरांचे डोळे लागले आहेत. आतापर्यंत प्रकल्प क्षेत्र परिसरात ४१० मिमी ४१० मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजपर्यंत ३०.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा झाला असला तरी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

अशी आहे मांजरा धरणाची स्थिती :

प्रकल्पा क्षमता २२४.०९४ दलघमी असून, सद्य:स्थितीत (१०३.४५४) दलघमी आहे. त्यातील ४७.१३० दलघमी मृतसाठा आहे. पाणी पातळी गाठण्यासाठी मोठा पाऊस हवा आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा १०३.४५४ दलघमी आहे तर धरणाच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठ्याची टक्केवारी ३१.८३ टक्के आहे.