अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपिकतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक, काच वेगळे करावेत, असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
बँकांच्या सेवा केंद्रात ग्राहकांची लूट
अंबाजोगाई : शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांमधून सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. ग्राहक सेवा केंद्राकडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. यासंदर्भात बँकांनी दक्षता बाळगावी व ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी बँकेचे ग्राहक, नागरिकांमधून होत आहे.
विनामास्कची कारवाई दिवसापुरतीच
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन तालुक्यात होत नाही. प्रशासनही याबाबत उदासीन आहे. मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर अंबाजोगाई नगर परिषद प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यानंतर कारवाईचे सत्र एक दिवसातच संपले.
शेतकऱ्यांना आठ तास विजेची प्रतीक्षा
अंबाजोगाई : नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी केली. परंतु शेतकऱ्यांना अद्याप दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे. रात्री जागून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.