शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात सापडल्या इंग्रजी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

अविनाश कदम आष्टी : गेल्या १८ महिन्यांपासून कोरोनामुळे इंग्रजी शाळा, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय ...

अविनाश कदम

आष्टी : गेल्या १८ महिन्यांपासून कोरोनामुळे इंग्रजी शाळा, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जात आहे, परंतु पालकांनी वेळेत फीस न भरल्यामुळे ऑनलाईन शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर असून इंग्रजी माध्यमांतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

बीड जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या २०३ शाळा असून यापैकी अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी २०२० - २०२१ या वर्षात काही शाळांनी वेगवेगळ्या प्रकारे पालकांना फीमध्ये सवलत दिली आहे. या वर्षीही फीमध्ये सवलत देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पत्र काढून सक्तीची फीस वसुली करू नका, विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये असे सूचित केले आहे. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या अडचणींबाबतही विचार करायला हवा होता. शाळांनी पालकांना फीमध्ये सवलत दिली आहे. शाळेची इमारत उभारण्यासाठी घेतलेले कर्ज, शिक्षक,शिक्षिका, इतर कर्मचाऱ्यांचे करावे लागणारे पगार या अडचणीच्या बाजू जिल्हा प्रशासनाने व पालकांनी समजून घ्याव्यात, असे संस्था चालकांनी सांगितले.

पालक, प्रशासनाने समजून घ्यावे

मुलांना सध्या ऑनलाईन शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून दिले जात आहे. फीमध्ये टप्प्याटप्प्याने सवलत दिली आहे. कर्मचारी अन् ऑनलाईन शिक्षणाचा खर्च असल्याने पुढे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पालकांनी व प्रशासनाने शाळांचाही विचार करून मदत करावी. - नागसेन कांबळे, प्राचार्य, इंग्रजी माध्यम शाळा, आष्टी.

प्रशासन इंग्रजी शाळेच्या प्रश्नांबाबत उदासीन

इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबत जिल्हा प्रशासनाने जे पत्रक काढले आहे. त्याआधी इंग्रजी माध्यमाच्या संस्था चालकांची बाजू समजून निर्णय घ्यायला हवा होता. - निखिल वाघमारे, राज्य सचिव, इंडिपेन्डेन्स इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन.

पालकांनी सहकार्य करावे

जरी कोरोना संकटामुळे प्रशासनाचे नियम शाळांना बंधनकारक केले असले तरी आमच्या मुलांना शिक्षण घेणे गरजेचे आहे. सध्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत. यासाठी शाळेने निर्धारित केलेली फी टप्प्याटप्प्याने पालकांनी भरावी. सर्व पालकांनी शाळेला सहकार्य करावे, असे मला वाटते. - राजेंद्र रोकडे, पालक आष्टी.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ५० टक्के सवलत द्यावी

कोरोनाच्या भयंकर काळात पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक बाबतीत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ५० टक्के सवलती द्यावी, अशी आमची मागणी आहे . - एन. एच. शेख, पालक आष्टी ------------