शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

बीड : उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. दीनदयाळ अंत्योदय योजना ...

बीड : उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद बीड अंतर्गत शहरातील भाजी मंडई येथे नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष क्षीरसागर बोलत होते.

शहरातील असंघटित कामगारांना एकत्रित करून उपजीविका भागविण्यासाठी शहर स्तर संघाची स्थापना केली जाते. १५ ते २० स्वयंसाहाय्य गटांचे मिळून एक ‘वस्ती स्तर संघ’ तयार होतो. या वस्ती स्तर संघ एकत्र येऊन एक ‘शहरी स्तर संघ’ तयार केला जातो. शहरी स्तर संघाच्या माध्यमातून असंघटित कामगारांना एकत्रित करून उपजीविका भागविण्यासाठी तयार केलेल्या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष म्हणाले की, या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून बचतगटांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तीनशे ते चारशे कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. बीड शहरातील नागरिकांना घरबसल्या घरगुती सेवा या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच शहरातील अनेक लहान-लहान असंघटित कामगारांना या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याने उपजीविकासंबंधी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून करणार आहोत. महिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शहरात एक हजार महिला बचतगटांची स्थापना केली असल्याचे सांगितले.

बीड शहरात मोठ्या प्रमाणात महिला बचतगटांची निर्मिती झाली असल्याने महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून व्यासपीठ तयार करून देणार असल्याचे सांगितले. नगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी लवकरच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कायमस्वरूपी स्टॉल उभारण्यात येणार असून कमीत कमी दरांमध्ये हे स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे महिला बचतगटांनी या स्टॉलचा फायदा घेण्याचे आवाहन करत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरातील प्रत्येक भागात जाऊन महिला बचतगटांची बैठक घेऊन या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राची माहिती देण्यासंदर्भात सूचना केल्या.

याप्रसंगी न.प.चे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, नगरसेवक गणेश वाघमारे, शालिनी परदेशी, हामेद चाऊस, लता तांबारे, किश्किंदा पांचाळ व न.प.चे या विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

260721\26_2_bed_29_26072021_14.jpg

बचत गट बीड