शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी कमतरतेने पाणी चोर निर्धास्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:23 IST

कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

ऑनलाईन लोकमत

माजलगाव (बीड), दि. १३ : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचा बराचसा भाग गेवराई व माजलगांव तालुक्यातुन माजलगांव धरणापर्यंत आलेला आहे. कालव्याच्या मार्गातील अनेक गावातील नागरिकांनी हा कालवा जागोजागी फोडलेला आहे. यासोबतच धरणातील पाण्याची देखील मोठया प्रमाणावर चोरी होत आहे.परंतु; जलसंधारण व उपसा सिंचन विभागाच्या माजलगाव येथील कार्यालयात कर्मचा-यांची कमतरता असल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. 

माजलगांव धरणाच्या पाण्यावर तसेच पैठण येथुन कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम उपसा सिंचन योजनेच्या दोन शाखांमार्फत केले जाते. दोन्ही शाखांमध्ये मिळुन कालवा निरीक्षकांची 6 पदे, दप्तर कारकुनची 2 पदे व मजुरांची 6 अशी 14 पदे रिक्त आहेत. यामुळे या शाखांमार्फत आता केवळ कार्यालयीन कामच होते. प्रत्यक्ष कामासाठी येथे कर्मचारीच नाहीत. 

बिनधास्त चोरले जाते पाणी  धरणाकडे येणा-या कालव्याला ठिकठिकाणी लोकांनी छिद्र पाडून पाणी वळवलेले आहे. एका गावात तर चक्क बंधा-यात ओढुन घेतलेले आहे त्यामुळे पैठण वरुन निघालेल्या पाण्याच्या केवळ 10 टक्के इतकेच पाणी धरणात येते. याने  कालव्याची अगदी चाळण झाली आहे. यातच कालवा निरीक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे कालव्यावर नेमके काय चाललेय याची माहिती विभागाला फार उशिराने मिळते. माहिती मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तसेच कारवाईसाठी निरीक्षकच नसल्यामुळे या पाणी चोरांवर कोणतीच कारवाई करता येत नाही. यामुळे हे पाणी चोर अगदी निर्धास्त आहेत. 

दुसरीकडे, याच विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या धरणातील पाण्याचा देखील मोठया प्रमाणावर अवैधरीत्या उपसा  होत आहे. धरणावरुन शेतीसाठी पाणी उपसा करण्याचे 1586 जणांना परवाने देण्यात आलेले आहेत. यातील केवळ 350 परवाना धारकाच पाणी उपसा करत आहेत. या व्यतिरिक्त दीड ते दोन हजार मोटार मात्र विनापरवानाच पाणी उपसा करत आहेत. पाटबंधारे विभागा अंतर्गत असलेली जवळपास सर्वच कार्यालये ही सन 2000 मध्ये माजलगांव येथुन परळी येथे स्थलांतरीत झालेले आहेत. यामुळे विभागाचा सारा कारभार परळी येथून राबवला जातो. हा कारभार म्हणजे उंटावरुन शेळया हाकल्या सारखाच असल्याने पाणी चोरीला आळा घालणे अवघड झाले आहे.

कर्मचारी कमतरतेने अडचणीकार्यालयात कर्मचा-यांच्या कमतरतेबाबत आम्ही वरिष्ठांना वेळोवेळी कळवलेले आहे. कर्मचा-यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पाणी चोरी संदर्भात कारवाई करण्यास अडचणी येतात.- व्ही. आर.फड, शाखा अधिकारी, माजलगांव जलसंधारण व उपसासिंचन शाखा क्र.- 2