शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक पोरखेळ नाही, लोकप्रतिनिधी जबाबदारीने निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:53 IST

बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा ...

ठळक मुद्देबाळासाहेब पिंगळे : जरूड, बाभुळखुंटा, मौजवाडीत ग्रामस्थांशी संवाद; विकासासाठी साथ देण्याचे जयदत्त क्षीरसागर यांचे आवाहन

बीड : आपला लोकप्रतिनिधी निवडताना जबाबदारीने निवडावा. जयदत्त आण्णा हे विकासिप्रय नेतृत्व आहे. ही पोरखेळ असलेली निवडणूक नाही. आण्णा हे अनुभवी व सक्षम असे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या रूपाने शिवसेनेचा अनुशेष भरून काढायचा आहे असे प्रतिपादन बाळासाहेब पिंगळे यांनी केले.नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील जरु ड, बाभूळखुंटा तसेच मौजवाडी येथे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी भेटी दिल्या. त्याप्रसंगी शिवेसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी बैठकीस शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, गणपत डोईफोडे, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, जगदीश काळे, अरूण बोंगाणे, राजेंद्र राऊत, बप्पासाहेब घुगे, झुंजार धांडे, सखाराम मस्के, गणेश वरेकर, रामनाथ काकडे, बबन कोरडे, शहादेव काकडे, पंजाब काकडे इत्यादींची उपस्थिती होती.बाभळखुंटा येथील बैठकीतही धनुष्यबाणाला मतदान हाच विकासाचा रामबाण उपाय आहे असा कार्यकर्त्यांचा सूर होता. मौज, मौजवाडी येथे प्रभाकर ढेमरे व सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गणेश वरेकर म्हणाले की, नाळवंडी सर्कलमधून नंबर एकचे मताधिक्य शिवसेनेला होणार आहे. आण्णांना आपण एकमताने ताकद दिली तर शिवसेनेकडून सर्व आश्वासने पूर्ण होतील. मतदान मशीनवर पहिल्याच क्र मांकाचे चिन्ह धनुष्यबाण असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी दिनकर कदम यांच्या नेतृत्वाखाली डी.सी.सी. बँकेचे संचालक स्व.बन्सीधरराव सातपुते यांचे नातू शिवम सातपुते यांच्यासह पांडूरंग सातपुते, रामेश्वर जाधव, रवि डोंगरे, राजेश डोंगरे, शरद विटकर, सुरेश सातपुते, सदाशिव सातपुते, अशोक सातपुते, लक्ष्मण सातपुते, किशोर टेकाळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.विरोधकांच्या प्रयोगाला बळी पडू नकाजयदत्त क्षीरसागर म्हणाले, गावागावात शासनाच्या योजना पोहोचवून त्याचा लाभ गावाला मिळवून देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. मतदारांनी दिलेला विश्वास पाच वर्ष निरंतर सेवा देऊन सार्थ करतो. तुमच्यासमोर जी कामे केली आहेत ती आपण पुढाकार घेऊन केलेली आहेत.केवळ आश्वासने दिलेली नाहीत. विरोधक रोटी-बोटी-चपटीचा प्रयोग करतील त्यांना आपण बळी पडू नका. केंद्रात जे सरकार आहे ते सरकार राज्यात येणार आहे त्यामुळे विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी आपली साथ मला द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना